जलदुर्गांचा विकास करुन पर्टन वाढवणार

अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणासाठी मोठी घोषणा केली आहे. कोकणचं वैभव राखण्यासाठी सरकार कटिबद्ध असून जलदुर्गांचा विकास करुन पर्यटन वाढवू. तसेच येत्या एप्रिलमध्ये कोकणात व्हायरोलॉजी लॅब सुरू करणार आणि चांगली दवाखाने सुरू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोना व्हायरसवर भरयभीत होऊ नका असे नागरिकांना निवेदन दिले. ते म्हणाले की, ‘दर दिवसाआड मी बैठका घेत आहे. मागील महिनाभर आम्ही लक्ष ठेवून आहोत. मुंबई, पुणे, नागपूर इथे चाचणी करण्याची सुविधा करण्यात आली आहे. आपण भयभीत न होता या संकटाचा मुकाबला केला पाहिजे. भयभीत झाल्यामुळे करू नये त्या चुका आपण लवकर करतो. मास्कचा पुरेसा साठा केला आहे. विमानतळावर सफाई करणार्‍या कर्मचार्‍यांना मास्क आणि विशिष्ट कपडे पुरवण्याच्या सूचना दिल्या आहेत. लोकांची जनजागृती करण्यासाठी जाहीराती करण्याच्या सूचना केल्या आहेत. आवश्यकता नसेल तिथे गर्दी करू नका. पुढील आठ दिवस काळजीचे आहेत. होळीही मर्यादीत स्वरुपात करावी. परदेशातून येणार्‍या सर्व प्रवाशांची चाचणी सुरू केली आहे’