पालिकेच्याविद्यार्थ्यांना जलतरणाचे प्रगत प्रशिक्षण
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 14, 2026
- 34
नवी मुंबई ः महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना ऑलिम्पिक स्तरावर खेळल्या जाणाऱ्या ‘जलतरण’ या क्रीडा प्रकारात आपले कौशल्य सिद्ध करुन प्राविण्य मिळविण्यासाठी तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्याचे काम महापालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाकडून करण्यात येत आहे.
याकरिता घणसोली सेंट्रल पार्क येथील जलतरण तलावावर नमुंमपा शाळा क्रमांक 42, घणसोली येथील मुलामुलींची प्राथमिक स्तरावर दि. 10 व 11 एप्रिल, 2026 रोजी निवड चाचणी घेण्यात आली. यामध्ये 110 मुले व 62 मुलींनी सहभाग घेतला. याकरिता क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव यांनी पुढाकार घेऊन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. अर्चना म्हात्रे यांचेशी समन्वय साधला व प्रशिक्षणाबाबत चर्चा केली. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी सहशिक्षक श्री.संतोष मुंढे, श्री. राजेश पाडळे, श्रीम.स्मिता पुकळे व श्रीम. अदिती काळे यांनी साधारणपणे पोहता येते अशा इच्छुक मुलामुलींना मनापासून प्रोत्साहित करीत क्रीडा विभागाशी समन्वय साधून निवड चाचणी घेण्यासाठी उत्तम सहकार्य केले.
या प्राथमिक निवड चाचणी मधून 21 मुले व 6 मुलींची अंतिम निवड करण्यात आली असून आता पुढील टप्प्यात प्रगत प्रशिक्षण देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. यामधून आगामी काळात सन 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत इतर खाजगी शाळांमधील जलतरणपटूंसोबत नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विद्यार्थी जलतरणपटू स्पर्धांमध्ये सहभागी होऊन नवी मुंबई महानगरपालिकेचा नावलौकिक उंचावतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, आयुक्त डॉ.कैलास शिंदे, स्थायी समितीचे सभापती अशोक पाटील, सभागृह नेते सागर नाईक, विरोधी पक्ष नेते विजय चौगुले, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती गिरीश म्हात्रे, अतिरिक्त आयुक्त डॉ.राहुल गेठे, क्रीडा विभागाच्या उपआयुक्त अभिलाषा म्हात्रे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai