शहराच्या विकासाला मिळणार चालना
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 15, 2026
- 28
आ. मंदाताई म्हात्रे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सकारात्मक चर्चा
नवी मुंबई ः नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावलं उचलत आमदार मंदाताई म्हात्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली. ही विकास चर्चा शहरासाठी नवी दिशा देणारी ठरली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, बेलापूर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज आणि महिला बचत गटांसाठी ‘उमेद मॉल’ यां यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांना गती मिळत असून, नवी मुंबईचा विकास आता अधिक वेगाने होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. सक्षम नेतृत्व, मंदाताईंचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि विकासाची ठाम भूमिका यामुळे नवी मुंबई प्रगतीच्या नव्या उंचीवर जात आहे.
नवी मुंबई नवी मुंबईतील विविध प्रलंबित व महत्त्वाच्या विकासकामांबाबत आमदार मंदा म्हात्रे यांनी दि. 13 एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयातील दालनात भेट घेतली. या बैठकीत नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी खालील महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक सविस्तर व गंभीर चर्चा करण्यात आली आहे. नवी मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याच्या दृष्टीने झोपडपट्टी पुनर्वसन योजनांना गती देण्याबाबत सखोल चर्चा झाली. यामुळे गोर गरीब जनेतला सुरक्षित व सुसज्ज निवास उपलब्ध होणार आहे. महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी ‘उमेद मॉल’ उभारण्याकरिता नवी मुंबईमध्ये 1000 चौ.मी.चा भूखंड उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सिडकोला आदेश दिले आहेत. बेलापूर येथे प्रस्तावित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज प्रकल्पाला लवकरात लवकर गती देण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबईच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकल्पांबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला असून, या बैठकीमुळे शहराच्या पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा आणि महिला सक्षमीकरणाला नवी चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai