पाण्यासाठी शांततामय जनआंदोलन करणार
- by Aajchi Navi Mumbai
- May 08, 2026
- 18
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील पाणीटंचाईविरोधात नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. सरकारी प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात 17 मे रोजी शांततामय जनआंदोलन छेडण्याचा इशारा भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने देण्यात आला आहे. पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील 29 गावांमध्ये तसेच खारघर, तळोजा, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल या सिडको उपनगरांमधील विविध भागांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सदनिकेची किंमत कोटी रूपये मात्र पिण्यासाठी टँकरचे पाणी अशी अवस्था खारघर व तळोजामधील नागरिकांची झाली आहे. नागरिकांना अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने महिलांपासून ते ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनाच मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाढती लोकसंख्या, नव्या वसाहती आणि औद्योगिक विस्तार यामुळे पाण्याची मागणी वाढली असताना पुरवठा मात्र अपुरा पडत आहे.
शेकापचे नेते व पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी दिलेल्या निवेदनात पनवेल महापालिकेला खेटून असलेल्या
नवी मुंबई महापालिकेकडे 100 एमएलडी अतिरिक्त पाणी उपलब्धता असून त्यातील किमान 30 एमएलडी अतिरिक्त पाणी तातडीने पनवेलला देण्यात यावे, अशी मागणी वारंवार करूनही नवी मुंबई महापालिका यावर कोणताही ठोस निर्णय घेत नसल्याने पनवेलच्या नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर शेकाप नेते म्हात्रे यांनी दिलेल्या निवेदनात 17 मे रोजी सकाळी 11 वाजता कामोठे येथील पाणीपुरवठा केंद्राजवळ शांततामय जनआंदोलन आयोजित करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. या आंदोलनात लोकशाही मार्गाने आवाज उठवला जाईल आणि कायदा-सुव्यवस्था राखत प्रशासनाचे लक्ष वेधले जाईल, असे म्हात्रे यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai