जीएस मेडिकलचा दणदणीत विजय
- by Aajchi Navi Mumbai
- May 15, 2026
- 18
प्रो.ए.एस. छगला करंडकावर नाव कोरले
मुंबई : प्रोफेसर ए.एस. छगला इंटर मेडिकल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जी.एस. मेडिकल कॉलेज-केईएम हॉस्पिटल संघाने शानदार कामगिरी करत डी. वाय. पाटील डेंटल कॉलेजचा 5 विकेटने पराभव करून विजेतेपद पटकाविले. बॉम्बे जिमखाना मैदानावर रंगलेल्या या थरारक सामन्यात अभिजीत (राठोड 70 धावा) आणि दिपेश कुमार (42 धावा) यांच्या दुसऱ्या विकेटसाठी 103 धावांच्या भागीदारीमुळे जीएस मेडिकलचा विजय सुकर झाला.
बॉम्बे जिमखाना येथे झालेल्या अंतिम सामन्यात डी. वाय. पाटील डेंटल कॉलेजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र जीएस मेडिकलच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून अचूक मारा करत प्रतिस्पर्धी फलंदाजांवर दबाव निर्माण केला. फिरकीपटू श्रीराम फुलझालके यांनी अवघ्या 6 धावांत 3 बळी घेत प्रभावी कामगिरी केली, तर निखिल नावडकर यांनी 31 धावांत 3 आणि आदित्य बभाले यांनी 2 बळी घेतले. त्यामुळे डी. वाय. पाटील डेंटल कॉलेजचा डाव 30.4 षटकांत 165 धावांवर आटोपला.
डी. वाय. पाटीलकडून आरव अडवाणीने 31 चेंडूत 37 धावांची खेळी केली. गौरव शेंडेने 25, तर प्रणव कुमारने 23 धावांचे योगदान दिले. मात्र इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. 166 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जीएस मेडिकलची सुरुवात सावध झाली. त्यानंतर सलामीवीर अभिजीत राठोड आणि दिपेश कुमार यांनी दुसऱ्या विकेटसाठी 103 धावांची भक्कम भागीदारी करत सामन्यावर पकड मजबूत केली. अभिजीत राठोडने 69 चेंडूत 70 धावांची खेळी साकारत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला, तर दिपेश कुमारने 39 चेंडूत 42 धावा फटकावत त्याला सुरेख साथ दिली. या दमदार फलंदाजीच्या जोरावर जी.एस. मेडिकल कॉलेज-केईएम हॉस्पिटलने 26.1 षटकांत 5 बाद 169 धावा करत विजेतेपदावर मोहोर उमटवली.
सदर स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला माजी भारतीय क्रिकेटपटू संदीप पाटील आणि प्रोफेसर आदिल छगला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्या आणि उपविजेत्या संघांचा गौरव करण्यात आला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai