100 दिवस जनसेवेचे
- by Aajchi Navi Mumbai
- May 22, 2026
- 18
महापौरांनी सेवाकार्याचा मांडला लेखाजोखा
नवी मुंबई ः ‘नवी मुंबई महानगरपालिका 6.0’ चा पहिला 100 दिवसांच्यासेवाकार्याचा सविस्तर लेखाजोखा सत्ताधारी भाजपच्यावतीने बुधवारी (ता.20) मांडण्यात आला. 100 दिवसांमध्ये वनमंत्री गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईकरांना अधिक सक्षमपणे सोयी सुविधा देण्याबरोबर महासभेने जनहिताचे निर्णय तसेच विकास कामे केल्याचा दावा महापौर सुजाता पाटील यांनी केला आहे.
100 दिवसांच्या कार्यकालाच्या निमित्ताने महापौर पाटील यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. अल्प कालावधीत ‘काम वेगात, निर्णय जनतेच्या हितात’ ह्या सूत्रानुसार शहर विकासाच्या दृष्टीने, विशेषतः पायाभूत सुविधा, शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात अनेक ऐतिहासिक व महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. हा केवळ सुरुवातीचा टप्पा असून, नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी, जनतेच्या हितासाठी आणि आगामी काळातही विकासकामांचा वेग अधिक गतीने, अधिक प्रभावी आणि अधिक जनकेंद्री ठेवण्याचा आमचा निर्धार कायम राहील. यावेळी उपमहापौर दशरथ भगत, सभागृहनेते सागर नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, आरोग्य समिती सभापती डॉ.जयाजी नाथ, जेष्ठ नगरसेवक रामचंद्र घरत, नगरसेविका शुभांगी पाटील, नगरसेवक सूरज पाटील आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, 1949 नुसार महानगरपालिकेचे कामकाज पारदर्शक, शिस्तबद्ध आणि लोकाभिमुख पद्धतीने चालवले जात आहे. जनतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत प्रत्येक निर्णय कायदेशीर चौकटीत, उत्तरदायित्वाच्या भावनेतून आणि शहर विकासाच्या स्पष्ट दृष्टीकोनातून घेतला जात आहे. शहराच्या विविध महत्त्वाच्या विषयांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यासाठी महापालिकेच्या विविध तदर्थ समित्यांची स्थापना करण्यात आली आहे या समित्यांच्या माध्यमातून निर्णयप्रक्रियेत पारदर्शकता अधिक मजबूत करण्यात आली आहे, अशी माहिती महापौर पाटील यांनी दिली.
100 दिवसांच्या कालावधीत शहर विकासाला नवी दिशा देणारे जे महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले, त्यामध्ये अनेक गोष्टींचा, कामांचा समावेश आहे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता कर व पाणी पट्टीमध्ये कोणतीही करवाढ न करण्याचा महत्वपुर्ण निर्णय, गावठाण भागात गरजेपोटी केलेली व एलआयजीची बांधकामांना शास्ती न्युनतम 5% करण्याबाबतचा दिलासा दायक निर्णय मंजुर, सर्वसमावेशक वायू प्रदूषण निर्मूलन व वायू गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम, नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील गावठाण भागात गरजेपोटी केलेली व एलआयजीची बांधकामांना तिप्पट कर रदद करणे बाबत प्रस्ताव मंजुर करण्यात आला. तसेच नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण रुपांतरण धोरण 2026 - मराठी माध्यम शाळांना इंग्रजी माध्यम शिक्षणात रूपांतरित करण्याचा एक महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला.
महिला महापौर या नात्याने महिलांच्या सक्षमीकरणासाठी परिवहन सेवेमध्ये “बसचालक“ म्हणून पहिल्या टप्प्यात महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्याबाबत ठोस पाऊल उचलले आहे. नवी मुंबईतील वाहतूक सुरळीत होण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रात सिटी मोर्बलिटी प्लॅन अंतर्गत उड्डाणपूल उभारणे व दुहेरी भुयारी मार्ग निर्माण करणे याविषयी महत्वाचा निर्णय झाला. पालिका शिक्षण मंडळ स्थापन करणे, पाणी पट्टी शुल्कावर 90 % सवलत देण्यास मान्यता, पालिकेतील आरोग्य विभागात रुग्ण सहाय्यता कॉल सेंटर / डॅशबोर्ड बाबत महत्वाची भूमिका बजावली आहे. पालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यामध्ये संयुक्त समन्वय समिती स्थापन करणेबाबत निर्णय, पालिका परिवहन कार्यरत कर्मचाऱ्यांना वेतनवाढबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai