तुर्भेतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाला विरोध
- by Aajchi Navi Mumbai
- May 22, 2026
- 25
नवी मुंबई : तुर्भे स्टोअर परिसरातील डम्पिंग ग्राउंडला विरोध दर्शवत नागरिकांचे आरोग्य धोक्यात टाकणारे डम्पिंग ग्राउंड हटवण्याची मागणी मागील 15 वर्षात पासून स्थानिकांनी लावून धरली आहे. मात्र, आता तुर्भे स्टोरमधील याच डम्पिंगच्या मैदानावर पालिकेकडून नव्याने ‘वेस्ट टू एनर्जी’, सी.जी.बी (कंप्रेस्ड बायोगॅस) प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याला नागरिकांकडून कडाडून विरोध करण्यात येत आहे. यासाठी शिवसेनेचे (शिंदे गट) नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्या समवेत लोकप्रतिनिधींनी आणि नागरिकांनी दोन दिवस आमरण उपोषण केले. दुसऱ्यादिवशी सदर प्रकल्पा संदर्भात बैठक घेत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत हा प्रकल्प सुरु करण्यात येणार नाही असे आश्वासन आयुक्तांनी दिल्या नंतर उपोषण स्थगित करण्यात आले.
तुर्भे स्टोरमधील डम्पिंगच्या मैदानावर पालिकेकडून नव्याने वेस्ट टू एनर्जी सी.जी.बी (कंप्रेस्ड बायोगॅस) प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याला नागरिकांकडून कडाडून विरोध करण्यात येत आहे. आतापर्यंत 15 वर्ष नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या पालिकेला आता कुणाचा जीव घ्यायचा आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रकल्पाविरोधात शिंदेसेनेचे नगरसेवक सुरेश कुलकर्णी व इतर लोकप6तिनिधींनी 19 मे रोजी आमरण उपोषण सुरु केले. तुर्भे येथील नागरिक पूर्वी पासूनच डम्पिंग ग्राउंडमुळे त्रस्त झाले आहे. नागरिकांना दमा, टिबी यासारखे जीव घेणे आजार झाले काही जणांनी आपले प्राण देखील गमावले आहेत. असे असताना पालिका आयुक्त कोपरखैरणे सारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जागा असताना सुद्धा हा प्रकल्प तुर्भे येथे आणून नागरिकांच्या आरोग्याची खेळ करू पाहत आहेत. जर हा प्रकल्प पूर्वी कोपरखैरणेला होता तर त्याचे तुर्भे डम्पिंग ग्राउंडवरच स्थलांतर करण्याचा आयुक्तांचा हट्टास का आहे? असा प्रश्न नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे. वेस्ट एनर्जी प्रकल्पामुळे या ठिकाणी बफरझोन घोषित केल्यास झोपडपट्टी वाशी यांचा पुनर्वसनाचा प्रकल्प थांबणार आहे. त्यांना वर्षानुवर्ष झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांचे स्वप्न होणार आहे त्यामुळेच या प्रकल्पाला विरोध केल्याची भूमिका कुलकर्णी आणि आंदोलयांकर्त्यांनी मांडली. या आमरण उपोषणात नगरसेविका अबोली महेश कुलकर्णी, नगरसेविका सविता लगाडे, नगरसेविका सविता सांगळे, नगरसेविका संगीता वास्के, नगरसेविका मुद्रिका गवळी, प्रल्हाद शेल्हाळकर तसेच प्रभागतील नागरिक सहभागी झाले होते.
तुर्भे विभागातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुरू असलेल्या तुर्भे डम्पिंग ग्राउंड, व वेस्ट टू एनर्जी प्रकल्प स्थलांतरित करण्याच्या मागणी संदर्भात आज ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के व शहर अभियंता शिरीष आदरवड यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांच्याशी संपर्क करीत जोपर्यंत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर व वेस्ट टू एनर्जी प्रकल्पा संदर्भात बैठक घेत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत हा प्रकल्प सुरु करण्यात येणार नाही असे आश्वासन दिल्या नंतर उपोषण स्थगित करण्यात आले. हा लढा फक्त माझे एकट्याचे नसून समस्त तुर्भे विभागातील नागरिकांच्या आरोग्यासाठी व तुर्भे करांच्या अस्तित्वासाठी हा लढा आहे. हा लढा तुर्भे डम्पिंग ग्राउंड, व वेस्ट टू एनर्जी प्रकल्प स्थलांतरित करण्या संदर्भात आहे. हा लढा थांबणार किंवा संपणार नाही, नवी मुंबई महानगरपालिकेने जर या मागण्या पूर्ण नाही केल्या तर या पुढे मोठ्या स्वरूपाचे तीव्र आंदोलन उपोषण करू असे संबधित अधिकाऱ्यांना ठणकावून सांगण्यात आले.
अनेक वर्षांपासून घराच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना त्यांच्या हक्काच्या घरांपासून वंचित ठेवण्याचा हा डाव आहे. या प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या बफर झोनचा परिणाम हजारो झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसन प्रक्रियेवर होणार आहे. तुर्भेकरांच्या जीवाशी खेळणारा हा घातक प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ दिला जाणार नाही. स्थानिक नागरिक यांच्या भावनांशी पालिकेने खेळू नये. हा लढा थांबणार किंवा संपणार नाही, नवी मुंबई महानगरपालिकेने जर या मागण्या पूर्ण नाही केल्या तर या पुढे मोठ्या स्वरूपाचे तीव्र आंदोलन उपोषण करू. - सुरेश कुलकर्णी, शिवसेना नगरसेवक
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai