शिवसेेनेकडून प्रियंका चतुर्वेदींना राज्यसभेची उमेदवारी
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 12, 2020
- 527
मुंबई : राज्यसभेसाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसमधून आलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांना उमेदवारी दिली. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेसच्या प्रमुख प्रवक्त्यांपैकी एक असलेल्या प्रियंका चतुर्वेदी या शिवसेनेत आल्या होत्या. त्यांचा हा प्रवेश सगळ्यांनाच धक्का देणारा होता. इंग्रजी आणि हिंदी भाषेवर उत्तम पकड आणि दिल्लीच्या उच्चभ्रू ल्युटीयन्स वर्तुळात त्यांचा उत्तम जनसंपर्क आहे. त्याचबरोबर त्यांचं आदित्य ठाकरे यांच्याशी उत्तम ट्युनिंग आहे. त्यामुळे दिल्लीत शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिल्याचे बोलले जात आहे.
शिवसेनेत राज्यसभेची उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार लॉबिंग झाले होते. माजी खासदार चंद्रकांत खैरे, ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांची नावं चर्चेत होती. मात्र या सगळ्यांना डावलत उद्धव ठाकरे यांनी प्रियंका चतुर्वेदींवर विश्वास व्यक्त केला.
खडसेंना पुन्हा एकदा धक्का
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. त्यांना भाजपकडून राज्यसभेत पाठवलं जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र भाजपने जाहीर केलेल्या दुसर्या यादीत त्यांचं नाव नाही. तर भाजपने डॉ. भावत कराड यांना उमेदवारी जाहीर केलीय. भाजपच्या संसदीय मंडळाच्या मान्यतेनंतर ही यादी जाहीर करण्यात आली होती. तर विधान परिषदेसाठी अमरीश पटेल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai