विविध नागरी सुविधा कामांना स्थायीची मंजूरी
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 27, 2026
- 28
नवी मुंबई ः महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेमध्ये महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या विविध नागरी सुविधा प्रस्तावांना स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समिती सभेत चर्चेअंती सर्वानुमते मंजूरी प्राप्त झाली.
नवी मुंबई शहराची ओळख अनेक गोष्टींप्रमाणे उद्यानांचे शहर म्हणूनही केली जात असून या अनुषंगाने विविध उद्यानांचे आवश्यकतेप्रमाणे सुशोभिकरण करुन नागरिकांना चांगल्या दर्जाची विरंगुळ्याची ठिकाणे उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. अशाचप्रकारे वाशी से.7 येथील आई-बाबा उद्यान विकसीत करण्याच्या रु.25 लक्ष 90 हजार तसेच वाशी से.6 येथील ज्ञान कलश उद्यान विकसीत करण्याच्या रु. 30 लक्ष 59 हजार रक्कमेच्या कामास मंजुरी देण्यात आली. से.8 नेरुळ येथील कंडोमिनियम अंतर्गत मलनि:स्सारण वाहिन्या या कमी व्यासाच्या असून नादुरुस्त झालेल्या आहेत त्यांचे चेंबर्सही खचलेले आहेत. त्यामुळे मलनि:स्सारण वाहिन्यांमध्ये अडथळा होऊन सांडपाणी योग्य प्रकारे निचरा होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत आहेत. या अनुषंगाने से.8 नेरुळ येथील कंडोमिनियम अंतर्गत मलनि:स्सारण वाहिन्यांची सुधारणा करणे या कामासाठी रु.63 लक्ष 5 हजार इतक्या रक्कमेच्या कामास मंजुरी प्राप्त झाली.
बेलापूर विभागातील सीबीडी से.3 येथील राजीव गांधी क्रीडासंकुल तेथील स्थानिक नागरिकांचे व नवी मुंबईकरांचे खेळण्याचे उत्तम ठिकाण आहे. सदर स्टेडिअमच्या कंपाउुंट वॉलची दुरुस्ती करणे अत्यावश्यक असून सदर रु.29 लक्ष 26 हजार रक्कमेच्या कामास मान्यता प्राप्त झाली. घणसोली विभागात शांतीनगर परिसरातील गटारे व पदपथ यांची दुरवस्था झाली असून नागरिकांना रहदारीसाठी होणारा त्रास दूर करण्याच्या दृष्टीने त्याठिकाणी 371 मी. लांबीचे व 0.70 मी. रुंदीचे गटार बांधणे तसेच 356 मी. लांबीचे व 4 मी. रुंदीचे पदपथ बांधण्याच्या कामास आणि त्यापोटी रु. 89 लक्ष 62 हजार खर्चास मंजुरी प्राप्त झाली. त्याचप्रमाणे घणसोली विभागात बाळाराम वाडी येथील एका भागात गटार नसल्याने पाण्याचा निचरा होत नाही व पाणी रस्त्यावर जमा होते. ही बाब लक्षात घेउुन या ठिकाणी 130 मी. लांब व 1.10 मी. रुंद गटार बांधण्याच्या कामास व त्यापोटी रु.31 लक्ष 12 हजार रक्कमेस स्थायी समितीची मंजुरी प्राप्त झाली. अशाप्रकारे स्थायी समितीने प्रशासनामार्फत सादर केलेल्या विविध नागरी सुविधा कामांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai