सिडकोकडून तक्रारींचे जलद निवारण
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 03, 2026
- 13
नवी मुंबई ः नागरिकाभिमुख प्रशासन अधिक सक्षम करण्याच्या दिशेने सिडकोच्या दोन विभागांनी विविध सार्वजनिक तक्रार निवारण मंचांवरील तक्रारींचे अवघ्या एका आठवड्यात उल्लेखनीय निवारण करून प्रभावी कामगिरी केली आहे. नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत आणि प्रभावीपणे निवारण करून या विभागांनी प्रतिसादक्षम, पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासनाबाबतची सिडकोची बांधिलकी अधोरेखित केली आहे.
गृहनिर्माण विभागाने आपले सरकार, पीजी पोर्टल आणि मुख्यमंत्री कार्यालय तक्रार निवारण प्रणालीवरील सर्व प्रलंबित तक्रारींचे यशस्वीपणे निवारण केले. प्रभावी समन्वय आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे विविध तक्रार निवारण मंचांवरील तक्रारींचे वेळेत निवारण करण्यात विभागाला यश आले. त्याचप्रमाणे, सहनिबंधक विभागाने विविध सार्वजनिक तक्रार निवारण मंचांसह मुख्यमंत्री कार्यालय तक्रार पोर्टलवरील 323 तक्रारींचे यशस्वी निवारण करून प्रलंबित तक्रारींमध्ये लक्षणीय घट केली. विभागाच्या सक्रिय व पद्धतशीर कार्यपद्धतीमुळे तक्रार निवारण यंत्रणा अधिक सक्षम झाली आहे. नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निवारण आणि त्यावर दर्जेदार व समाधानकारक प्रतिसाद देणे, हे प्रतिसादक्षम प्रशासनाचे महत्त्वाचे मापदंड आहेत. या विभागांनी केलेली कामगिरी सिडकोची उत्तरदायित्व, कार्यक्षमता आणि लोकसेवेप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित करते. सर्व विभागांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांचे व्यवस्थापकीय संचालक अश्विन मुद्गल यांनी कौतुक केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai