सिडकोत माहिती अधिकार कार्यशाळा संपन्न
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 03, 2026
- 13
नवी मुंबई ः महाराष्ट्र शासनातर्फे नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम - 2026 या अधिसूचने संदर्भात सिडको कर्मचाऱ्यांना माहिती देण्याच्या तसेच कामकाजामध्ये पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने सिडको भवन येथे 01 जुलै 2026 रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी डॉ. राजा दयानिधी, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, सुरेश मेंगडे, मुख्य दक्षता अधिकारी यांसह सिडकोतील विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी डॉ. राजा दयानिधी यांनी माहिती अधिकारांतर्गत महत्त्वाच्या तरतुदी व त्याबाबत कार्यालयात प्राप्त होणाऱ्या अर्जावर सकारात्मक निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये जन माहिती अधिकारी तसेच अपिलीय अधिकारी यांची जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले. सुरेश मेंगडे यांनी कार्यशाळेच्या सुरुवातीस बोलताना ङ्गमाहिती अधिकाराची प्रभावी अंमलबजावणी करणेकामी यामधील सुधारित तरतुदींची अधिकारी/कर्मचारी यांनी माहिती करून घ्यावी. तसेच जनतेला या कायद्यान्वये देण्यात आलेले अधिकार त्यांना मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहावे, असे प्रतिपादन केले.
कार्यशाळेतील प्रमुख वक्ते व सिडकोचे सल्लागार मोहन गवस यांनी महाराष्ट्र ङ्गमाहितीचा अधिकार नियम - 2026 मधील सुधारित तरतुदींबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच माहितीच्या अधिकारांतर्गत आपली कर्तव्ये पार पाडताना उद्भवणाऱ्या अडचणी याविषी उपस्थित केलेल्या शंकाचे निरसन मोहन गवस यांनी केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai