भाजीपाल्याच्या दरांत घसरण
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 03, 2026
- 13
नवी मुंबई : सलग तीन दिवस सुरू असलेल्या पावसाचा परिणाम मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहारांवरही दिसू लागला आहे. भाजीपाल्याची आवक नियमित असतानाही ग्राहक आणि किरकोळ विक्रेत्यांचे प्रमाण घटल्याने बाजारातील उठाव मंदावला. त्यामुळे अनेक भाज्यांच्या घाऊक दरांत 30 ते 40 टक्क्यांपर्यंत घसरण झाली असून, भाजीपाला मोठ्या प्रमाणात बाजारातच पडून राहिला.
एपीएमसी भाजी बाजारात बुधवारी सुमारे 550 वाहनांमधून भाजीपाल्याची आवक झाली. मात्र सततच्या पावसामुळे मुंबई, नवी मुंबई आणि उपनगरांतील अनेक भागांत पाणी साचले होते. त्यामुळे किरकोळ विक्रेते आणि ग्राहक बाजारात पोहोचू शकले नाहीत. परिणामी, दुपारपर्यंतही मोठ्या प्रमाणात माल विक्रीविना बाजारात पडून होता. मागणी घटल्याने घाऊक बाजारातील अनेक भाज्यांचे दर 30 ते 40 टक्क्यांनी कमी झाले. आवक सुरळीत असूनही मागणी घटल्याने निर्माण झालेली ही परिस्थिती भाजीपाला व्यापारासाठी चिंतेची बाब ठरत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai