राज्यातील दूध उत्पादक तुकाराम मुंढे यांच्या रडारवर
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 03, 2026
- 14
सेव्ह फुड, सेव्ह ड्रग मोहिम; भेसळमुक्त दूध मिळण्यासाठी 8 नियमांचे पालन बंधनकारक
मुंबई ः अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त झाल्यापासून तुकाराम मुंढेंच्या करवाईचा धडाका सुरुच आहे. अशातच आता, दूध सम्राटांकडे त्यांनी मोर्चा वळवला असून आहे. त्याच अनुषंगाने नियमावली सादर करण्यात आली असून सेव्ह फुड, सेव्ह ड्रग ही मोहिम हाती घेण्यात आली आहे.
तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषद घेत शुक्रवारी सविस्तर माहिती दिली. सेव्ह फूड सेव्ह ड्रग ही मोहीम हाती घेतल्याची माहिती देत सांगितले की, महाराष्ट्र शासनाने दुध व दुग्धजन्य पदार्थाच्या संपूर्ण पुरवठा साखळीत अन्न सुरक्षा व गुणवत्ता मानकांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यव्यापी सर्वकष अनुपालन आदेश जारी केला आहे. या आदेशाचा उद्देश केवळ भेसळ रोखणे नसून सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण वाढ करणे, प्रामाणिक दुध व्यवसायांना प्रोत्साहन देणे आणि राज्यात आधुनिक अन्न सुरक्षा संस्कृती विकसित करणे असल्याचे म्हटले आहे. सुरक्षित, शुद्ध सकस आणि भेसळमुक्त दूध उपलब्ध करून देण्याबाबत मार्गदशक सूचना जारी केली आहे. राज्यभर करण्यात आलेल्या तपासण्या, निरीक्षणे, नमुना विश्लेषणे व अंमलबजावणी कारवाईतून दूध पुरवठा साखळीच्या विविध टप्प्यांवर काही गंभीर त्रुटी सातत्याने निदर्शनास आल्या. आपल्या अन्नात सगळ्यात महत्वाचा घटक असतो दूध. दुधातली भेसळ, कृत्रिम दूध या सगळ्या संबंधी गाईडलाइन्स दिल्या आहेत. दूध उत्पादकांना पॅकर्स पासून सेलर पर्यत 8 प्रकारचे नियम सगळ्यांना लागू आहेत. दूध जर सील बंद नसेल तर ते कोणीही घेऊ नये असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी केले आहे. सुट्या स्वरूपात दूध विकता येणार नाही, रॉ मिल्क असेल तर त्यावर ते कच्च आहे ते उकळून प्यावे असा लिहावं लागेल. सिंथेतीक मिल्क म्हणजे अस्सल दूध नसून रासायनिक पदार्थ वापरून तयार केलेले भेसळयुक्त उत्पादन आहे भेसळ केल्यास किंवा नियम मोडल्यास विविध स्तरावर कारवाई केली जाणार आहे. सुट्टे दूध घेताना नागरिकांनी काळजी घ्यावी. तो दूध विकणारा खरोखरच शेतकरी आहे का हे पाहावं असे मुंढे म्हणाले. खोटी जाहिरात केली तर 10 लाख दंड लावण्यात येणार आहे. शाळा परिसरात काय विकलं जावं जाऊ नये याबाबत सुद्धा आदेश काढणार आहोत.
गुटख्यावर बंदी असल्याची माहिती मुंढे यांनी दिली आहे. जर कुठे चुकीचा प्रकार आढलला तर कारवाई करु असेही ते म्हणाले. आईस्क्रीम, कुल्फी, चॉकलेट याबाबत देखील स्पष्ट गोष्टी लिहणं गरजेचं असल्याच ते म्हणाले. कोणत्याही स्टार्च किंवा नॉन मिल्क पदार्थ त्यामध्ये वापरला असले त्याबाबतची माहिती देणं बंधनकराक राहणार आहे. दूध शितकरण केंद्रासंदर्भात देखील नियमावली जारी केली आहे. पायाभूत सुविधा आणि स्वच्छता महत्त्वाच्या आहेत. तापमान मेन्टेन करायला हवं, सांडपाण्याची व्यवस्था देखील करणं गरचं असल्याचे तुकाराम मुंढे म्हणाले. पेस्ट कंट्रोलबाबत बोलताना ते म्हणाले की, पेस्ट कंट्रोल कोणत्याही अनधिकृत व्यक्तीकडून करून चालणार नाही. ते शासनाकडे नोंदणीकृत असलेल्या एजन्सीकडूनच करून घ्यावे लागेल आणि त्याचा कायदेशीर वैध करार आस्थापनेकडे असणे बंधनकारक आहे. प्रक्रिया केंद्र, डेअरी किंवा हॉटेलच्या आवारात एकही उंदीर, कीटक अथवा माशी आढळल्यास कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. काही व्यावसायिक पेस्ट कंट्रोल न करताच केवळ दाखवण्यासाठी खोटे किंवा जुने प्रमाणपत्र गोळा करतात. अशा फसवणुकीवर थेट कडक कारवाईचा इशारा दिला आहे.
- नियम कोणाला लागू असतील?
दूध संकलन केंद्र, दूध शीतकरण सेंटर्स, दुग्धप्रक्रिया युनिट्स आणि उत्पादक, अल्ट्रा हाय ट्रिटमेंट, पॅकर्स आणि फिलिंग स्टेशन्स, वितरक, वाहतूकदार, किरकोळ विक्रेते, स्वयंचलित दूध विक्री चालक, दुग्धजन्य पदार्थ विक्रेते या सर्वांना हे नियम लागू असणार आहेत. पनीर, खवा, तूप, लोणी, क्रीम, दही, चीज, दूध पावडर, फ्लेवर्ड मिल, आईस्क्रीम या सर्व पदार्थांचा यात समावेश आहे.
नियम कोणते?
- रजिस्ट्रेशन, लायसन्स
- अन्न उत्पादन मानके आणि संयोजके
- दुषके विषय व अवशेष
- विक्रीवरील प्रतिबंध न निर्बंध
- लेबलिंग आणि प्रदर्शन
- अन्स सुरक्षा मानके पॅकेजिंग
- अन्नाचे फोर्टिफेकेशन
- जाहिरात आणि दावे
महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षीत अन्न देणं हेच आमचं मिशन आहे. शुद्ध सकस दूध द्यायचं आहे. त्यासाठी इको सिस्टीम विकसीत करत आहोत. भेसळयुक्त पदार्थांवर कारवाई करण्याचा आणखी एक उद्देश म्हणजे लोकांमध्ये जागृती होणं हा आहे. दुध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्याकरीता 2006,2011 व इतर 8 प्रकारच्या नियमांचे पालन होणे अत्यावश्यक आहे. - तुकाराम मुंढे, अन्न व औषध प्रशासन आयुक्त
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai