तीन दिवसात नवी मुंबईत 137 झाडे पडली
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 08, 2026
- 36
नवी मुंबई ः राज्यभरात पावसाने हाहाकार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचणे, झाडांची पडझड, नाले तुंबणे, नद्याधोकादायक पातळीवर असणे अशा घटना ऐकायला मिळत आहेत. नवी मुंबईतही धुवाधार पाऊस सुरु असून सोसाट्याच्या वाऱ्याने तीन दिवसांत तब्बल 137 झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. कुठे बांधकामांची पत्राची संरक्षण भिंत पडून अपघात, कुठे बाल्कनीचा भाग कोसळून मृत्यू तर कुठे पाणी साचण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. आपत्तकालीन परिस्थितीचा सामना करम्यासाठी प्रशासन सज्ज असून नागरिकांनाहीखबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 4 जुलै रोजी सकाळी 8.30 ते 5 जुलै सायं. 5.30 वा. पर्यंत सरासरी 245.96 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. सदर कालावधीत वादळी वाऱ्यासह पाऊस असल्याने 65 इतक्या मोठ्या संख्येने झाडे पडली आहेत. त्या झाडांना मार्गातून हटविण्याचे काम अग्निशमन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यांच्या वतीने प्राधान्याने केले. यामध्ये 4 जुलै रोजी 10 झाडे पडणे, 1 झाडाची फांदी पडणे तसेच 11 ठिकाणी पाणी साचण्याच्या घटनांची नोंद झाली आहे. 6 जुलै 2026 रोजी, सकाळी 8.30 ते सायं.5.30 वा. पर्यंत सरासरी 53.40 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पर्जन्यवृष्टीसोबत अतिशय तीव्रतेने वादळी वारे वाहत असल्याने मोठ्या संख्येने झाडांची पडझड झाली. आपत्कालीन मध्यवर्ती नियंत्रण कक्षात प्राप्त झालेल्या सूचना व तक्रारींनुसार आजच्या दिवसात ठिकठिकाणी 62 झाडे पडल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. या झाडांना मार्गांतून हटवून रहदारी खुली करण्याचे काम अग्निशमन विभागाचे जवान आपत्कालीन विभागीय नियंत्रण कक्षाच्या सहकार्याने अथकपणे केले.
नवी मुंबई शहर हे समुद्रसपाटीपासून खाली वसलेले असल्याने भरतीच्या वेळी मुसळधार पाऊस असल्यास सखल भागांमध्ये पाणी साचते. यादृष्टीने काळजी घेण्याकरिता आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार आपत्कालीन मदतकार्य यंत्रणा क्षेत्रीय स्तरावर सज्ज आहे. महापौर सुजाता पाटील यांनीही नवी मुंबई क्षेत्रातील परिस्थितीची फिल्डवर पाहणी केली. या परिस्थितीत नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन महापौर सुजाता पाटील आणि आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात आले आहे.तसेच जोरदार पावसासह वादळी वाऱ्यामुळे झाडे पडण्याचे प्रमाण वाढले असून नागरिकांनी झाडाखाली उभे राहू नये व आपल्या गाड्याही झाडाखाली पार्क करू नयेत असेही आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ज्या इमारती नवी मुंबई महानगरपालिकेने धोकादायक जाहीर केलेल्या आहेत वा धोकादायक स्थितीत आहेत त्या तत्परतेने रिकाम्या कराव्यात व संभाव्य दुर्घटना टाळाव्यात असेही नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. शुक्रवारपासून पावसाने उसंत घेतली नसल्याने सुरक्षेच्या दृष्टीने सलग4 दिवस शाळांनाही सुट्ट्या देण्यात आल्या अहेत. अतिशय महत्वाच्या कामाव्यतिरिक्तघराबाहेर पडून ये असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येतआहे.
नवी मुंबई महानगरपालिका नागरिकांच्या सुरक्षेसाठी व सेवेसाठी कटिबध्द असून कोणत्याही स्वरूपाच्या अडचणीच्या परिस्थितीत नवी मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
- दूरध्वनी : 022-27567060 / 61
टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक : 1800222309 / 1800222310
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai