मासिक पाळी स्वच्छता जनजागृती
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 08, 2026
- 29
उरण ः शीलक्ष्मी सोशल फाउंडेशन व श्री समर्थ कृपा सखी स्वयं सहायता संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जीईआयएस नेटिव्ह इन्स्टिट्युट उरण येथे मासिक पाळी स्वच्छता व आरोग्य जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत एकूण 95 शाळकरी मुलींना पुनर्वापर करता येणाऱ्या सॅनिटरी पॅड्सचे वितरण करण्यात आले.
मासिक पाळीविषयी असलेले गैरसमज, भीती, लाज व सामाजिक टॅबू दूर करण्यासाठी सविस्तर मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले. मुलींना स्वच्छता, योग्य पॅड वापर, त्याची निगा व वेळोवेळी बदलण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. स्वयंसेविका हृदया पाटील व भैरवी यांनी मासिक पाळी आरोग्य समुपदेशन सत्र घेतले. त्यांनी मुलींना शारीरिक बदल, हार्मोन्स, वेदना व्यवस्थापन तसेच मानसिक आरोग्य याबाबत सखोल माहिती दिली. पॅड बदलणे, स्वच्छता राखणे यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो. योग्य स्वच्छतेअभावी विविध आजार उद्भवू शकतात, त्यामुळे प्रत्येक मुलीने याबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. मासिक पाळीदरम्यान शरीरातील रक्तस्त्रावामुळे लोहाची कमतरता होण्याची शक्यता असते. त्यामुळे लोहयुक्त आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. संतुलित आहारामुळे मुलींचे एकूण आरोग्य सुधारते व अशक्तपणा कमी होतो.
मुलींनीही उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या शंका विचारल्या व योग्य मार्गदर्शन मिळवले. या कार्यक्रमास शीलक्ष्मी सोशल फाउंडेशन संस्थेच्या अध्यक्षा रजनी ताजणे, श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहाय्यता संस्थेच्या अध्यक्षा समाजसेविका रायगड भूषण संगीता सचिन ढेरे, उपाध्यक्ष मीनाक्षी कोळी उपस्थित होत्या. ताजणे यांनी शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण भोये, शिक्षक व सर्व स्वयंसेवकांचे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मनःपूर्वक आभार मानले.हा उपक्रम मुलींमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणारा ठरला असून मासिक पाळीविषयी समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिला जात आहे.
- गरजू विद्यार्थ्यांना रेनकोटचे मोफत वाटप
शीलक्ष्मी सोशल फाउंडेशनच्यावतीने गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत रेनकोट वितरण अभियान उत्साहात पार पडले. विविध शाळांमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना दर्जेदार रेनकोटचे वितरण करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांनी व्यक्त केलेले समाधान हे उपक्रमाचे यश अधोरेखित करणारे ठरले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा रजनी ताजणे म्हणाल्या, ‘प्रत्येक मुलाला कोणत्याही अडचणीशिवाय शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. पावसाळ्यात रेनकोट नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची शाळा चुकते. ही परिस्थिती बदलण्यासाठी शीलक्ष्मी सोशल फाउंडेशन सातत्याने सामाजिक उपक्रम राबवत असून भविष्यातही शिक्षण, आरोग्य व महिला सक्षमीकरण क्षेत्रात विविध लोकहिताचे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना पावसाळ्यात शाळेत जाणे अधिक सुरक्षित व सोयीचे होणार असून पालकांनी या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai