कांदळवनाचे संरक्षण करणाऱ्यांसाठी बक्षीस
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 01, 2026
- 29
मुंबई : कांदळवनांवरील अतिक्रमण, बांधकामे आणि मलबा टाकण्याच्या प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येईल. कांदळवनांचे संरक्षण करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस योजना राबविण्याचा विचार असून, निसर्गाचा ऱ्हास करणाऱ्यांमध्ये कायद्याची भीती निर्माण होईल अशी कठोर शिक्षा व्हावी, असे प्रतिपादन वनमंत्री गणेश नाईक यांनी केले.
आंतरराष्ट्रीय कांदळवन परिसंस्था संवर्धन दिनानिमित्त आयोजित कांदळवन प्रतिष्ठान पुरस्कार वितरण सोहळा 2026 मध्ये ते बोलत होते. वाय. बी. चव्हाण सेंटर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वनमंत्री गणेश नाईक म्हणाले, राज्यातील कांदळवनांचे संरक्षण ही काळाची गरज आहे. समुद्रकिनारी आढळणारे पक्षी, मासे, कासव आणि इतर सागरी जैवविविधतेचे संवर्धन करण्याची जबाबदारी वन विभागावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक पेड माँ के नाम अभियानाला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या 300 कोटी वृक्षलागवडीच्या आवाहनाला प्रतिसाद देत वन विभाग हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे.
मुंबईतील कांदळवन परिसरात मोठ्या प्रमाणावर मलबा टाकणे व अनधिकृत बांधकामे होत असल्याच्या तक्रारींची दखल घेत चेन्नई विद्यापीठाच्या सहकार्याने 2005 पासूनच्या उपग्रह आणि गुगल प्रतिमांच्या आधारे अतिक्रमणांची पडताळणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. संबंधित अधिकाऱ्यांना ही माहिती पाठवून प्रभावी कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी अपर मुख्य सचिव वन मिलिंद म्हैसकर यांनी सांगितले की, राज्यातील कांदळवन क्षेत्र 222 चौरस किलोमीटरवरून 315 चौरस किलोमीटर (31 हजार 500 हेक्टर) इतके वाढले आहे. देशातील सुमारे 95 टक्के कांदळवन पश्चिम बंगाल, गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा आणि अंदमान-निकोबार या राज्ये व केंद्रशासित प्रदेशात आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि वसई-विरारसारख्या दाट लोकवस्तीच्या भागात कांदळवन असल्याने त्यांचे संरक्षण हे मोठे आव्हान असल्याचे त्यांनी नमूद केले. कांदळवन कार्बन साठा वाढविण्यास महत्त्वाची भूमिका बजावतात तसेच लोकसहभाग आणि स्थानिकांच्या उपजीविकेलाही त्यातून बळ मिळते, असेही त्यांनी सांगितले. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास रेड्डी यांनी महाराष्ट्रात कांदळवन क्षेत्रात सातत्याने वाढ होत असल्याचे सांगितले. तर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल) एम. श्रीनिवास राव यांनी वनसंपदेचा लोकांच्या उपजीविकेशी आणि राज्याच्या आर्थिक विकासाशी घनिष्ठ संबंध असून सागरी जैवविविधतेच्या संरक्षणासाठी कांदळवन संवर्धन महत्त्वाचे असल्याचे नमूद केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai