केबीपीमध्ये मानसिक स्वास्थ्यावर राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 03, 2026
- 23
नवी मुंबई : रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये मानसशास्त्र विभागाच्या वतीने सामाजिक समावेश आणि मानसिक स्वास्थ्य : विकसित भारत 2047 या विषयावर 29 व 30 सप्टेंबर रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्राचे उद्घाटन नवी मुंबईतील ज्येष्ठ मानसोपचार तज्ञ डॉ. विकास देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. सुनील जगधनी होते. यावेळी मानसोपचार तज्ञ डॉ. विकास देशमुख यांनी मानसिक आरोग्याबद्दल सविस्तर भाष्य केले. शारीरिक आरोग्य पेक्षा मानसिक आरोग्य श्रेष्ठ आहे. मानसिक ताण वाढत गेला तर मानसिक त्रास होतो आणि पुढे त्याचे मानसिक विकारात रूपांतर होते. शारीरिक दुखापतीप्रमाणे मानसिक आरोग्याच्या समस्या दिसत नाहीत त्यामुळे आपण सर्वांनी मानसिक आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. मानसशास्त्राकडे केवळ व्यक्तीला समजून घेणारे शास्त्र म्हणून न पाहता सामाजिक प्रश्न आणि मानवी दु:ख समजून घेण्याचे सामाजिक शास्त्र म्हणून पाहिले पाहिजे असे प्रतिपादन डॉ. गौतम गवळी यांनी यावेळी केले. तसेच होमी भाभा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास पाध्ये यांनी तंत्रज्ञान आणि भारतातील तरुणांचे मानसिक आरोग्य या विषयावर भाष्य केले. या चर्चासत्रामध्ये नेपाळ, हिमाचल प्रदेश, बेंगलोर व महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातून 214 प्राध्यापक व 177 विद्यार्थी सहभागी झाले होते. सदर चर्चासत्राला नवी दिल्ली येथील भारतीय सामाजिक विज्ञान व संशोधन परिषद यांचे अनुदान लाभले.
दोन दिवसीय चर्चासत्राचे नियोजन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभदा नायक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. चर्चासत्राचे प्रास्ताविक मानसशास्त्र विभागाचे डॉ. प्रवीण बाविस्कर यांनी केले. तर कला विभागाचे अधिष्ठाता डॉ. शकील शेख यांनी आभार मानले. सदरचे चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्या डॉ. राजेश्री घोरपडे व आदींनी विशेष प्रयत्न केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai