नवी मुंबईच्या शालेय बॅडमिंटनपटूंचा दमदार खेळ
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 16, 2026
- 30
जिल्हास्तरीय स्पर्धेत 237 संघांचा सहभाग; सात गटांतील विजेत्यांची मुंबई विभागीय स्पर्धेसाठी निवड
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धा 2026-27 ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वाशी येथील नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॅडमिंटन कोर्टवर झालेल्या या स्पर्धेत 14, 17 आणि 19 वर्षांखालील मुलांच्या गटात 132, तर मुलींच्या गटात 105 असे एकूण 237 संघ सहभागी झाले होते. सात गटांतील विजेत्या संघांनी आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर अजिंक्यपद पटकावत मुंबई विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि ठाणे जिल्हा क्रीडा परिषद यांच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. नवी मुंबईतील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये बॅडमिंटन खेळाची लोकप्रियता वाढत असून, या स्पर्धेतून उदयोन्मुख खेळाडूंच्या कौशल्याला व्यासपीठ मिळाले.
14 वर्षांखालील मुलांचा गट :
युरो स्कूल, ऐरोलीच्या संघाने अंतिम सामन्यात 2-1 सेटने विजय मिळवत अजिंक्यपद पटकावले. न्यू होरायझन स्कॉलर स्कूल, ऐरोलीने तिसरा क्रमांक मिळवला.14 वर्षांखालील मुलींचा गट : रिलायन्स फाउंडेशन स्कूल, कोपरखैरणेच्या संघाने न्यू होरायझन स्कॉलर स्कूल, ऐरोलीवर 2-1 सेटने मात करत विजेतेपद मिळवले. दिल्ली पब्लिक स्कूल, नेरूळने तिसरे स्थान पटकावले.
17 वर्षांखालील मुलांचा गट : माध्यमिक विद्यालय, सानपाडा संघाने सेंट झेवियर्स स्कूल, ऐरोलीविरुद्ध 2-1 सेटने विजय मिळवत अजिंक्यपदावर नाव कोरले. फादर ॲग्नेल स्कूल, वाशीने तिसरा क्रमांक मिळवला.
17 वर्षांखालील मुलींचा गट : फादर ॲग्नेल स्कूल, वाशीच्या संघाने डॉ. डी. वाय. पाटील स्कूल, नेरूळवर 2-0 सेटने मात करत विजेतेपद पटकावले. एव्हलॉन हाइट्स इंटरनॅशनल स्कूल, वाशीने तिसरा क्रमांक मिळवला.
19 वर्षांखालील मुलांचा गट : दिल्ली पब्लिक स्कूल, नेरूळच्या संघाने डॉ. डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेज, नेरूळवर 2-0 सेटने मात करत अजिंक्यपद मिळवले. एस. एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, नेरूळने तिसरे स्थान पटकावले.
19 वर्षांखालील मुलींचा गट : डी. ए. व्ही. पब्लिक स्कूल, ऐरोलीच्या संघाने फादर ॲग्नेल ज्युनिअर कॉलेज, वाशीविरुद्धच्या चुरशीच्या अंतिम सामन्यात 2-1 सेटने विजय मिळवला. ए. पी. जे. स्कूल, नेरूळने तिसरा क्रमांक मिळवला.
महापालिकेच्या क्रीडा, सांस्कृतिक व युवक कल्याण समितीचे सभापती गिरीश कान्हा म्हात्रे, शहर अभियंता शिरीष आरदवाड, कार्यकारी अभियंता राजेश पवार आणि क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत प्रोत्साहन दिले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा विभागाच्या उपआयुक्त अभिलाषा पाटील आणि क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख पंच शिवा करियाली, सहाय्यक संदीप पाटील तसेच नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनचे क्रीडा समन्वयक बाळासाहेब माळी यांनी विशेष योगदान दिले. या स्पर्धेतील विजेत्या संघांना पुढील मुंबई विभागीय स्पर्धेत नवी मुंबईचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. सर्व विजेत्या खेळाडूंचे महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, समिती सभापती गिरीश म्हात्रे आणि उपसभापती राजू मढवी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai