वाढीव भत्त्याचा प्रस्ताव मंजूर
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 16, 2026
- 30
नवी मुंबई ः पालिकेच्या महासभेने मंजूर केलेल्या ठरावानुसार सेवा-आधारित कंत्राटी कर्मचाऱ्यांना दरमहा 7,500 रुपये ‘नागरी सेवा संचालन विशेष भत्ता’ देण्याचा प्रस्ताव अखेर बुधवारी (ता. 15) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेना आणि मनसेच्या वतीने केलेल्या आक्रमक आंदोलन केले होते. मनसेच्या या यशस्वी लढ्यानंतर पालिका मुख्यालयासमोर पेढे वाटून व फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.
पालिकेच्या महासभेने कंत्राटी कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता देण्याचा निर्णय घेतला होता, मात्र ठराव मंजूर होऊन बराच कालावधी उलटूनही त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता. पगारवाढीच्या प्रस्तावाला आता स्थायी समितीने मंजुरी दिलेली आहे. या निर्णयामुळे महापालिकेच्या सुमारे 8 हजार कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पगाराता आता तब्बल 7 हजार 800 रुपयांची वाढ होईल. मात्र प्रशासकीय त्रुटी आणि अर्धवट प्रस्तावामुळे सागर नाईक यांनी आक्षेप घेत सुधारित प्रस्ताव पुढच्या स्थायी समितीमध्ये सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या. तत्पुर्वी स्थायी समितीमध्ये सादर केलेल्या संबंधित खर्चाला मंजुरी देऊन हा प्रस्ताव मंजुर करण्यात आला.
कंत्राटी कामगारांना वेतनवाढीची थकबाकी जून-जुलै महिन्यापासून देण्याची तयारी सुरु असून, दसऱ्याच्या मुहूर्तावर वाढीव वेतनाचा पहिला धनादेश कामगारांना सुपूर्द करण्याचे नियोजन असल्याची माहिती सभागृह नेते सागर नाईक यांनी दिली. त्यामुळे अनेक दिवसांपासून वेतनवाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. वेतनवाढीचा निर्णय प्रत्यक्षात लागू झाल्यानंतर कंत्राटी कामगारांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल. त्यामुळे दसऱ्यापूर्वी सदर प्रक्रिया पूर्ण होणार का? याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai