मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढण्याची भीती
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 01, 2020
- 562
5000 पेक्षा अधिक ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मध्ये ; राजेश टोपेंचा धक्कादायक माहिती
मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यादरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक धक्कादायक माहिती समोर आणली आहे. पुढील काही दिवसात मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करुन सध्या मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 162 वर पोहोचली असून 5000 पेक्षा अधिक जण हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. आज मुंबई महानगरपालिकेच्या वॉर रुमला राजेश टोपे यांनी भेट दिली यावेळी त्यांनी बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी बैठकीत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. राजेश टोपे म्हणाले, ‘मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या 162 वर पोहोचली आहे. त्यातही 5000 हून अधिक नागरिक हे हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये आहेत. यांना क्वारंटाइनमध्ये ठेवून चाचणी केली जाणार आहे. चार हजार लोक या हाय रिस्क व्यक्तींवर लक्ष ठेवून आहेत.
मुंबई शहरात 5 सरकारी आणि 7 खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाची चाचणी करण्याची सुविधा आहे. येथे दिवसाला 2 हजार चाचण्या होऊ शकतात. सध्या येथे दिवसाला 1200 चाचण्या होत आहे. प्रोटोकॉलनुसार चाचणी केली जात असून सध्यातरी अतिरिक्त चाचण्या करण्याची गरज नाही. शिवाय नवे 46 व्हेंटिलेटर मिळाले असून तब्बल 1 लाख एन-95 मास्क उपलब्ध असल्याची माहिती टोपेंनी दिली. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1600 पार गेला आहे. काल दिल्लीतील प्रकरणानंतर देशातील रुग्णांचा आकडा वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी दिल्लीतील निजामुद्दीन परिषदेत सहभागी झालेल्यांनी समोर यावे असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai