एपीएमसीमध्ये सॅनिटायझर स्टेशन

नवी मुंबई ः एपीएमसीतील भाजी मार्केटमध्ये सॅनिटायझर स्टेशनची निर्मिती करण्यात आली आहे. 15 फूट लांब यंत्रामुळे मार्केट मध्ये येणार्‍या प्रत्येकाचे निर्जंतुकीकरण करणे शक्य होणार आहे. भाजीपाला मार्केटच्या आवक गेटवर हे स्टेशन तयार करण्यात आले आहे. मार्केटमध्ये येणार्‍या प्रत्येकाला या 15 फूट लांब स्टेशनमधून यावे लागणार आहे. यामध्ये आलेले व्यक्तीच्या अंगावर सॅनिटायझरचे तुषार उडणार असून पूर्णपणे निर्जंतुकीकरण झाल्यानंतरच प्रत्येक नागरिकाला मार्केटमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. एपीएमसीच्या ऊर्वरित चार मार्केटमध्ये ही सॅनेटायझर स्टेशन लवकरच उभारण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.