देशात 21 हजार 700 कोरोना बाधित

नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांची संख्या 21 हजार 700वर पोहोचली आहे. आतापर्यंत 686 लोकांचा मृत्यू झाला असून 4325 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार कोरोनाबाधितांची संख्या सर्वात जास्त महाराष्ट्रात आहे. सध्या 5632 जणांना कोरोनाची बाधा झाली असून 269 लोकांचा मृत्यू झाला आहे.

आंध्रप्रदेश 895, अंदमान निकोबार 18, अरुणाचल प्रदेश 1, आसाम 35, बिहार 148, चंदिगढ 27, छत्तीसगड 36, दिल्ली 2248, गोवा 7, गुजरात 2407, हरियाणा 262, हिमाचल प्रदेश 40, जम्मू काश्मिर 407, झारखंड 49, कर्नाटक 443, केरळ 438, लडाख 18, मध्यप्रदेश 1695, मणिपुर 2, उत्तराखंड 46, उत्तरप्रदेश 1509 आणि पश्‍चिम बंगालमध्ये 456 कोरोनाबाधित रुग्ण आहेत.