स्थायी समिती सभापतीपदासाठी भाजपतर्फे अर्ज दाखल
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 27, 2020
- 634
पनवेेल : पनवेल महापालिकेच्या स्थायी समिती सभापती, महिला व बालकल्याण सभापती आणि प्रभाग समित्यांची कार्यकाळची मुदत संपल्यामुळे या रिक्त होणार्या जागांसाठी सत्ताधारी भाजपच्या वतीने 26 ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल करण्यात आले.
या निवडणुकीमध्ये स्थायी समिती सभापती पदासाठी नगरसेवक संतोष शेट्टी, महिला व बालकल्याण सभापती पदासाठी नगरसेविका मोनिका महानवर, तर प्रभाग समिती ‘अ’ साठी अनिता पाटील, प्रभाग समित ‘ब’ साठी नगरसेवक समिर ठाकूर, प्रभाग समिती ‘क’ साठी हेमलता म्हात्रे आणि प्रभाग समिती ‘ड’ साठी नगरसेविका सुुशीला घरत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महापालिकेचे सचिव तिलकराज खापर्डे यांच्याकडे संबंधित उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. 28 तारखेला निवडणुक होणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने ही निवडणूक पार पडणार आहे. माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत भाजप-रिपाई युतीचे बहुमत असल्याने त्यांचा या निवडणुकीत विजय निश्चित मानला जात आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai