महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेस केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 27, 2026
- 10
लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार; अनेक सुधारणा प्रस्तावित
नवी दिल्ली : लोकसभेतील महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेच्या दृष्टीने केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शुक्रवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयकातील सुधारणांना मंजुरी देण्यात आली. या नव्या प्रस्तावानुसार देशातील सर्व राज्यांमध्ये लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढवून त्याचबरोबर महिलांना केंद्रात आणि राज्यात 33 टक्के राजकीय आरक्षण देण्याच्या सुधारणेस मंजुरी मिळाली आहे.
केंद्र सरकारने मागील चार राज्यांच्या निवडणुकीच्या दरम्यान लोकसभेत महिला आरक्षण व मतदारसंघ पुनर्रचना करण्याचे बिल सादर केले होते. परंतु, या घटनेच्या तरतूदीच्या सुधारणेस आवश्यक ते पाठबळ न मिळाल्याने सरकारचा पराभव झाला होता. या पराभवाचे खापर विरोधकांच्या माथी मारुन भाजपने मतदारांकडे मतांसाठी हात पसरले होते. पुन्हा एकदा उत्तरप्रदेश, बिहार, गुजरात व पंजाब राज्यांच्या निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने पुरेसे होमवर्क करुन महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेचे बिलास मंजुरी मिळण्यासाठी संसदेचे संस्थगित विशेष अधिवेशन सोमवारपासून बोलावले आहे. त्याअनुषंगाने शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागील प्रस्तावाच्यावेळी विरोधकांनी सूचवलेल्या अनेक सुधारणांना मंजुरी दिली आहे.
या निर्णयातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लोकसभेच्या जागांमध्ये सर्व राज्यांसाठी समान प्रमाणात 50 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे लोकसभा मतदारसंघांची संख्या वाढली तरी एका राज्याचे दुसऱ्या राज्याच्या तुलनेतील प्रतिनिधित्वाचे प्रमाण बदलणार नाही. 1971 च्या जनगणनेच्या आधारे निश्चित झालेले राज्यांमधील जागांचे परस्पर प्रमाण पुढील 25 वर्षे म्हणजेच 2051 पर्यंत कायम ठेवण्यात येणार आहे. लोकसंख्येतील बदलामुळे काही राज्यांचे संसदेतील प्रतिनिधित्व तुलनेने कमी होण्याची भीती दूर करण्याच्या दृष्टीने ही तरतूद महत्त्वाची मानली जात आहे. या घटनादुरुस्तीचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी 33 टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद प्रत्यक्षात आणण्यासाठी मतदारसंघ पुनर्रचनेची प्रक्रिया जोडण्यात आली आहे. सरकारने यापुर्वीच महिला आरक्षणाच्या सादर केलेल्या बिलास विरोधकांनी मंजुरी देऊन ते तत्काळ लागु करण्याची मागणी केली असता सरकारने हे आरक्षण जणगणना झाल्यानंतर 2029 नंतर होणाऱ्या निवडणुकांसाठी लागू करण्याची घोषणा केली होती. परंतु, अचानक केंद्र सरकारला महिला आरक्षण बिल मतदार संघ पुर्नरचनेसह सार करण्याची आवश्यकता का पडली यामागे सरकारची 2029 च्या लोकसभा निवडणुकीमागची मोठी रणनिती दिसत आहे.
यापूर्वी एप्रिल महिन्यात केंद्र सरकारने यासंदर्भातील घटनादुरुस्ती विधेयक संसदेत मांडले होते. मात्र, लोकसभेत आवश्यक असलेले दोन-तृतीयांश बहुमत मिळवण्यात सरकारला अपयश आल्याने हे विधेयक मंजूर होऊ शकले नव्हते. आता नव्या सुधारणांसह सरकार पुन्हा हे विधेयक संसदेत मांडण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी 30 नोव्हेंबरपासून लोकसभेचे, तर 2 डिसेंबरपासून राज्यसभेचे विशेष कामकाज सुरू होणार आहे. 3 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालण्याची शक्यता आहे. जागांची संख्या वाढवून महिला आरक्षण लागू करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न जरी असला तरी अनेक पक्षांच्या भुमिकेवर त्याचे भवितव्य अवलंबून आहे.
- 2051 पयर्त डिलिमिटेशन न करण्याची सुधारणा मंजुर
सदर विधेयक मंजुर झाल्यास 2051 पर्यंत डिलिमिटेशन होणार नसल्याची तरतूद या विधेयकात केली आहे. मोदी व शाह 2047 पर्यंत देशात भाजप सत्तेत राहणार असल्याचे ठणकावून सांगत आहेत. त्याचबरोबर भारत 2047 साली विश्वगुरु होण्याचे स्वप्न भारतीयांना दाखवत आहेत. त्यामुळे आता होणारे डिलिमिटेशन भाजपच्या इच्छेनुसार झाल्यास भाजपला 2047 पर्यंत तरी सत्तेतून बाहेर काढता येणार नाही अशी भिती विरोधकांना आहे. - शरद पवारांची भूमिका गुलदस्त्यात
या विधेयकाला संसदेत मंजुरी मिळण्यासाठी 362 खासदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. मोदी सरकारकडे तुर्त 240 खासदारांचा पाठिंबा असून तृणमुल काँग्रेसचे 22 खासदार बिलाच्या समर्थनार्थ आहेत. तामिळनाडूचे थलपती व स्टॅलिन तसेच पंजाबचे भगवंत मान यांची भुमिका निर्णायक ठरणार आहे. देशाचे लक्ष शरद पवार यांच्या भुमिकेवर असून ते कोणता निर्णय घेतात यावर देशाचे राजकारण अवलंबून असल्याचे बोलले जाते. काँग्रेसनेही या बिलास विरोध करण्यासाठी पुर्णतः कंबर कसली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai