चिटफंडच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 18, 2020
- 807
सेमिनारवर छापा ; नऊ जणांना अटक
नवी मुंबई : मोठ्या प्रमाणात नफ्याचे आमिष दाखवून आर्थिक गुंतवणुकीसाठी चिटफंड चालवला जात होता. परंतु लॉकडाऊनच्या नावाखाली कंपनी बंद करून कोट्यवधींचा अपहार करुन नागरिकांची फसवणुक करण्यात आली. मात्र, त्याच व्यक्ती नवी कंपनी स्थापन करून पुन्हा नागरिकांची लूट करत असल्याचे समजताच सुरू असलेल्या सेमिनारवर छापा टाकून पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे.
नवी मुंबईसह मुंबई व ठाणे परिसरात स्मार्ट व्हिजन प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून चिटफंड चालवला जात होता. या कंपनीत जादा नफ्याच्या आमिषाला भुलून अनेकांनी पैसे गुंतवले होते. मात्र, लॉकडाऊनच्या कालावधीत संबंधितांनी कंपनीचे कार्यालय बंद करून पोबारा केला होता, तर लॉकडाऊनमुळे कंपनी तोट्यात गेल्याचे कारण गुंतवणूकदारांना सांगण्यात आले होते. अशातच त्याच कंपनीच्या प्रमुख व्यक्तींनी दुसरी कंपनी स्थापन करून त्याच पद्धतीने नागरिकांची लूट चालवली असल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार, आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अमर देसाई यांच्या पथकाने रविवारी रात्री रॉयल ऑर्चिड हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेमिनारवर छापा टाकला.सदर बिजनेस सेमिनार रिचहूड क्लब नावाच्या कंपनीमार्फत सुरू होते. यावेळी पोलिसांनी कंपनीच्या संचालकांबाबत चौकशी केली असता, स्मार्ट व्हिजन कंपनीच्या प्रमुख व्यक्तींनीच रिचहूड नावाने नवीन कंपनी स्थापन केली असल्याचे समोर आले. त्यानुसार, नऊ जणांना अटक करून त्यांच्या विरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी दोन्ही कंपन्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याची शक्यता आहे. त्यानुसार, पोलीस अधिक तपास करत आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai