मराठी साहित्यिकांनी अनुभवविश्व विस्तारावे
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 17, 2026
- 27
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अजित मगदूम यांचे प्रतिपादन
नवी मुंबई ः मराठी साहित्यातील साहित्यिकांचे जीवन विचार आणि चिंतन हे मध्यमवर्गीयच प्रामुख्याने राहिले असल्याने मराठी साहित्यिकांना, राज्य आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्यावर मर्यादा येतात. म्हणून आपल्या अनुभवाच्या कक्षा रुंदावण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि अनुवादक डॉ अजित मगदूम यांनी नेरुळ येथे संपन्न झालेल्या साहित्य संमेलनात आपल्या अध्यक्षिय भाषणात केले.
नवरंग साहित्य संस्कृती आणि कला मंडळ व नेरूळ जेष्ठ नागरिक ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरे मराठी साहित्य संमेलन नेरूळ येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात संपन्न झाले. ज्येष्ठ साहित्यिक आणि अनुवादक डॉ अजित मगदूम हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. ज्येष्ठ साहित्यिक प्रा एल बी पाटील, साहित्यिका प्रा प्रतिभा सराफ (मुंबई) संत साहित्य अभ्यासक कौमुदी गोडबोले (पुणे) ज्येष्ठ नागरिक संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे, ज्ये.ना.संघ ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रभाकर गुमास्ते आदीं यावेळी उपस्थित होते. या एक दिवसीय साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने उत्साहात झाली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष गज आनन म्हात्रे यांनी लिहिलेल्या रामदास बोट दुर्घटनेवरील हिंदी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. तसेच गज आनन म्हात्रे यांच्या साहित्य निर्मितीचा गौरव म्हणून त्यांना कादंबरी कोहिनूर हा पुरस्कार मा. महापौर सुजाता सुरज पाटील यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
डॉ मगदूम म्हणाले, मराठी साहित्यातील साहित्यिकांचे जीवन विचार आणि चिंतन हे मध्यमवर्गीयच प्रामुख्याने राहिले असल्याने मराठी साहित्यिकांना, राज्य आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्यावर मर्यादा येतात. म्हणून आपल्या अनुभवाच्या कक्षा रुंदावण्याची गरज आहे. त्याचबरोबर मराठी साहित्य अनुवादाच्या माध्यमातून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊ शकते असेही त्यांनी प्रतिपादन केले. दुपारच्या सत्रात आजच्या साहित्यात समाजाचे प्रतिबिंब या विषयावर चर्चासत्र मीनल वसमतकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले रवींद्र वाडकर रामदास पोटे यांनी आपले विचार मांडले डॉ चंदा नाथांनी यांनी सूत्रसंचालन केले.
ज्येष्ठ कवयित्री सुजाता राऊत यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन रंगत गेले. सूत्रसंचालक सुदेश जगताप यांनी विशेष रंगत आणली. काशिनाथ मढवी, चंद्रकांत पाटील, वृषाली मगदूम, मीनाक्षी तांडेल आणि इतर कवींनी आपल्या कविता सादर केल्या. साहित्य संमेलन एक साहित्य विषयाचे वैचारिक मंथन झाले त्यामुळे रसिकांना दिवसभराचे कार्यक्रम म्हणजे साहित्यिक-पवर्वणीच होती विशेष म्हणजे सभागृह हे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुडुंब भरलेले होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai