सिडको व्यवस्थापकीय संचालकपदी अश्विन मुद्गल
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 17, 2026
- 21
नवी मुंबई ः राज्य शासनाने मंगळवारी बड्या प्रशासकीय अधितकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये सिडको महामंडळाच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजयसिंघल यांची बदली झाली असून त्यांच्या जागी अश्विन मुद्गल यांनी 17 जून 2026 रोजी पदभार स्वीकारला.
सिडकोच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे विशेष कार्य अधिकारीपदावर नियुक्ती करण्यात आली. सिंघल यांच्या जागी अश्विन मुद्गल यांची सिडकोचे नवे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अश्विन मुद्गल हे एमएमआरडीए महामंडळात अतिरिक्त महानगर आयुक्त म्हणून कार्यरत होते. सन 2007 च्या तुकडीतील भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी असलेल्या अश्विन मुद्गल यांनी आपल्या प्रशासकीय सेवेची सुरूवात नाशिक जिल्ह्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून केली. त्यानंतर पंढरपूर-सोलापूर येथे उपजिल्हादंडाधिकारी, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा व यवतमाळ येथे जिल्हाधिकारी, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त, नागपूर इम्प्रूव्हमेन्ट ट्रस्टचे अध्यक्ष आणि नागपूरचे अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळले आहेत. अश्विन मुद्गल हे वाणिज्यिक शाखेचे पदवीधर आहेत.
सिडको हे देशातील अग्रगण्य नियोजन व विकास महामंडळांपैकी एक असून, सिडकोतर्फे राबविण्यात येणाऱ्या वैविध्यपूर्ण महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे महाराष्ट्रासह देशाच्या विकासाला मोठा हातभार लागत आहे. सध्या सिडकोमार्फत साकारण्यात येत असलेले सर्व महत्त्वपूर्ण प्रकल्प नियोजित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करणे हे माझे सर्वोच्च प्राधान्य राहील, असे मुद्गल यांनी सिडकोच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारताना सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai