तूझ्या मिठीत येताना माझा मलाच विसर पडतो बिलगून तूला जाताना चेहरा बघ कसा हसतो...
तूझ्या डोळ्यात पाहताना होतात जाग्या आठवणी अश्रू ही गालावर ओंघळतात लवते जेव्हा पापणी..
तूझ्यासोबत बोलताना मन तूझ्यातच रमून जाते गालावरची खळी तूझ्या नकळतच खुलून जाते...
कासावीस माझ्या मनात तूझ्या आठवणीची होते घालमेल.. कधी येईल परतून सरुन जाईल दुराव्याचा वेळ.. सांज-सकाळी येईल मज तूझी आठवण सांग कूठे रमवू माझे बैचेन मन..
मोना विलास सणस
Mona
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai