नव्या वर्षात इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे भाव वाढणार
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 30, 2020
- 776
आघाडीच्या कंपन्यांनी घेतला दरवाढीचा निर्णय
मुंबई : नव्या वर्षाच्या स्वागत करताना महागाईला सामोरं जावे लागणार आहे. जानेवारीपासूनच इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतीत 10 टक्क्यांनी वाढ होणार आहे. एलजी, पॅनॉसॉनिक आणि थॉमसन या आघाडीच्या कंपन्यांनी दरवाढीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीनसह इतर वस्तूंचे भाव वाढणार आहेत. दरम्यान, सॅमसंग, शाओमी कंपन्याचा अद्याप दरवाढीचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे.
नव्या वर्षात जानेवारी महिन्यापासून इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतीत 10 टक्क्यांनी वाढ होणार आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महागाईचा मोठा शॉक बसणार आहे. ऑटो इंडस्ट्रीपाठोपाठ इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या दरवाढीचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार जानेवारीपासूनच एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतीत ही दरवाढ होणार आहे. सध्या एलजी, पॅनॉसॉनिक आणि थॉमसन या आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांनी दरवाढीचा निर्णय घेतला आहे. एलजीच्या सर्व उत्पादनांची किंमत 7 ते 8 टक्क्यांनी वाढेल, असे कंपनीचे उपाध्यक्ष विजय बाबू यांनी जाहीर केले. पॅनॉसोनिकच्या उत्पादनांची किंमत जानेवारीत 6 ते 7 टक्क्यांनी वाढेल, तर पहिल्या तिमाहीत 10 ते 11 टक्क्यांपर्यंत दरवाढ पोहोचेल, असे कंपनीचे अध्यक्ष मनीष शर्मा यांनी सांगितले.
याशिवाय सोनी इंडिया कंपनीही परिस्थितीचा आढावा घेऊन उत्पादनांच्या किमतीबाबत निर्णय घेणार आहे, असे सांगण्यात आले आहे. सॅमसंग, शाओमी या कंपन्यांनी दरवाढीबाबत अजून कोणतीही घोषणा केलेली नाही.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai