दिल्लीची चौफेर नाकेबंदी
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 09, 2026
- 23
सीजेपी आंदोलन दडपण्यासाठी देशभर सरकारची धरपकड
नवी दिल्ली : 10 ऑक्टोबरला दिल्लीतील जंतरमंतर येथे सीजेपीकडून होणाऱ्या आंदोलनाची दखल केंद्र सरकारने घेऊन दिल्लीची चौफेर नाकेबंदी केली आहे. जंतर मंतर येथे आंदोलनाची परवानगी सरकारने नाकारली असून आंदोलनस्थळी आंदोलनकर्ते पोहचू नये म्हणून मेट्रो व रेल्वे स्थानके बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे शनिवारी देशातील व्होट चोरीबाबत दिल्लीत होणाऱ्या या आंदोलनाकडे देशाचे लक्ष लागले आहे.
इंडियन एक्सप्रेस वृत्तसमुहाने देशाचे मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी घेतलेले निर्णय हे सहमतीने न घेता एकतर्फी घेतल्याचे उघडकीस आणले. जंतरमंतर येथे आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यासाठी सीजेपी नेता अभिजीत दिपके, सौरव दास व आशुतोष रांका यांनी देशातील युवकांना चलो दिल्लीचा नारा दिला असून या आंदोलनाला देशातील सर्वच विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. मागील आंदोलनात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यास सीजेपीला यश आले होते.
सीजेपी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी 57 मेट्रो स्थानके बंद करण्याचा आणि 10 नजरबंदी केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन स्थानकांवर येणाऱ्या सर्व मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात येतील. रेल्वेने या गाड्या त्यांच्या मूळ स्थानकांवरूनच रद्द केल्या आहेत. सीजेपी आणि डाव्या विचारसरणीच्या संघटनांनी सरकारवर देशभरात समर्थकांना ताब्यात घेतल्याचा आरोप केला आहे. पोलीस हॉटेलची नोंदवही आणि ओळखपत्रांची तपासणी करत आहेत. संशयास्पद वाटणाऱ्या पाहुण्यांची थेट चौकशी केली जात आहे. 8 ते 11 ऑक्टोबर दरम्यान वास्तव्य केलेल्यांच्या नोंदींची छाननी केली जात आहे.नवी दिल्लीकडे गर्दी जमू नये यासाठी बस ऑपरेटर आणि त्यांच्या बुकिंगवर लक्ष ठेवले जात आहे. रेल्वे स्थानके आणि विमानतळांच्या आसपास मोठ्या गटांमध्ये येणाऱ्या लोकांवरही पोलीस कडक नजर ठेवून आहेत. दीपके यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, जर दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना जंतर मंतरपर्यंत पोहोचण्यापासून रोखले, तर त्यांना जिथे थांबवले जाईल तिथे जंतर मंतर उभारले जाईल.
- आंदोलनांपूर्वी लोकांना ताब्यात घेतले
अभिजीत दीपके यांनी बंगळूरमधील आंदोलनांपूर्वी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे सरकारवर निशाणा साधला होता. त्यांनी लिहिले होते, “तुमच्याकडे सत्ता असेल, पण रस्ते आमचे आहेत.“ इथेच आपण आपली लोकशाही परत मिळवू.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी नागरिकांसाठी ‘ओपन लेटर’ जारी केले आहे. ‘एक्स’वरील या पोस्टमध्ये त्यांनी तुमचा आवाज हा तुमचा अधिकार आहे आणि तुमची सुरक्षा हे आमचे कर्तव्य आहे. गणवेशाच्या मागेही एक माणूस असतो. त्याचेही कुटुंब आणि आपली माणसे असतात. फरक फक्त गणवेशाचा आहे, माणुसकीचा नाही,असे या पत्रात म्हटले आहे. - ज्ञानेश जाणार की राहणार?
यापूर्वी सीजीपीने जंतरमंतरवर केलेल्या आंदोलनानंतर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा मुद्दा चर्चेत आला. आता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजीपीने देशभर आंदोलनाची हाक दिली आहे.
10 ऑक्टोबर रोजी आंदोलक जंतरमंतरवर एकत्र येणार आहेत. त्यामुळे ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून केंद्र सरकार व निवडणूक आयोग काय भूमिका घेतात, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai