लॉकडाऊनसह 5 महत्वाच्या मुद्दयावर चर्चा
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 07, 2020
- 699
मुंबई : कोरोना संदर्भात राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातील इतर सहकार्यांसोबत चर्चा केली. या बैठकीत राज्यातील लॉकडाऊन, कोरोनाचाबाधितांचा वाढता मृत्यूदर अशा महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
लॉकडाऊनसह इतर मुद्द्यांवर काय ठरलं?
1. लॉकडाऊनच्या कालावधीबाबत अद्याप अंतिम निर्णय नाही. येत्या काही दिवसांत राज्यातील परिस्थिती पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार निर्णय
2. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या मृत्यूदराबाबत काही मंत्र्यांनी चिंता व्यक्त केली. तसंच केरळमध्ये मृत्यूदर कमी असण्याची नेमकी काय कारणं आहेत, याबाबत मंत्रिमंडळातील काही सदस्यांनी चर्चा केली.
3. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकदिवशी जास्तीत जास्त लोकांच्या चाचण्या होण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
4. मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी शहरातील स्थितीबाबत मंत्रिमंडळ बैठकीआधी प्रेझेन्टेशन दिलं.
5. महाराष्ट्रात अडकलेल्या इतर राज्यातील मजुरांच्या प्रश्नांविषयीदेखील चर्चा झाली. इतर राज्यांतील मजुरांना त्यांच्या त्यांच्या राज्यात सोडवण्यासाठी मदत करण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न आहे. परंतु देशभरातील लॉकडाऊन संपल्यानंतरचे हे शक्य होणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai