सोने, चांदीचे दर घसरले

मुंबई : सोने किंमतींमध्ये सतत चढ-उतार होत आहेत. परंतु आज सोने आणि चांदी यांची किंमत पुन्हा एकदा खाली आली आहे. आज मंगळवारी बाजार उघडताच सोने किंमत खाली आली. मागणीत घट झाल्याने सोने स्वस्त झाले आहे. सोने दर 1000 रुपयांनी घसरला. तर चांदीचा दर किलोमागे पाच हजार रुपयांनी खाली आला. सोने 10 ग्रॅमला 51,000 रुपये तर चांदीचा भावही घसरुन तो 60,000 रुपये प्रति किलो झाला. 

आज सोने-चांदीच्या भावात कमालीची घसरण पाहायला मिळाली. सोने प्रतितोळे एक हजार रुपयांनी उतरले तर चांदी पाच हजार प्रतिकिलोने कमी झाली आहे. सोने प्रतितोळे 52,000 वरून 51,000 प्रतितोळे झाले आहे. तर चांदी 65 हजार प्रतिकिलो वरून 60 हजार प्रतिकिलो झाली आहे. कमोडिटी मार्केटमध्ये सोन्याची मागणी घटल्यामुळे सोने दरात घसरण झालेली पाहायला मिळत आहे.