नवरात्रौत्सवासाठी राज्य सरकारची नियमावली

गरबा, दांडिया खेळण्यास बंदी मुंबई ः जगभर पसलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे यंदा सणउत्सवांनाही गालबोट लागले आहे. या परिस्थितीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भावही नियंत्रणात रहावा यासाठी गणेशोत्सवाप्रमाणंच नवरात्रोत्सवासाठीही राज्याच्या गृह विभागाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये दांडिया आणि गरबा खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं उत्साह काहीसा कमी असला तरीही, आदिशक्तीच्या आगमनासाठी सारे उत्सुक आहेत. नवरात्रोत्सवासाठी राज्याच्या गृह विभागाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. नव्या नियमावलीमुसार सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांसाठी देवीच्या मूर्तीची उंची मर्यादा 4 फूट, तर घरगुती मूर्तींसाठी ही मर्यादा 2 फूट इतकी करण्यात आली आहे. शिवाय यंदाच्या नवरात्रौत्सवात दांडिया किंवा गरब्याच्या आयोजनावर बंदी घालण्यात आली आहे. तसंच कोरोनासंदर्भात जनजागृती मोहीम राबवण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. नव्या नियमावलीनुसार सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांसाठी देवीच्या मूर्तीची उंची मर्यादा 4 फूट, तर घरगुती मूर्तींसाठी ही मर्यादा 2 फूट इतकी करण्यात आली आहे. तसंच कोरोनासंदर्भात जनजागृती मोहीम राबवण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. नवरात्रोत्सवासाठीची नियमावली सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी महापालिका/ स्थानिक प्रशासन यांची पूर्वपरवानगी घेणं आवश्यक. कोरोनाची परिस्थिती पाहता न्यायालय, महापालिका आणि स्थानिक प्रशासनानं मंडपासाठी आखलेल्या नियमांचं पालन करणं अनिवार्य. यंदाचा नवरात्रोत्सव साध्या पद्धतीनं साजरा करणं अपेक्षित असल्यामुळं सार्वजनिक आणि घरगुती नवरात्रोत्सवात देवीच्या मूर्तीची सजावट तशीच असावी. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांसाठी देवीच्या मूर्तीची उंची मर्यादा 4 फूट, तर घरगुती मूर्तींसाठी ही मर्यादा 2 फूट इतकी करण्यात आली आहे. पारंपरिक मूर्तीऐवजी घराती धातू, संगमरवर अशा मूर्तीची पूजा करावी. मूर्ती शाडूची अथवा पर्यावरणपूरक असल्यास विसर्जन घरच्या घरी करावं. असं नसल्यास कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करतेवेळी स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा. नवरात्रोत्ववासाठी वर्गणी, देणगी स्वेच्छेनं दिल्या स्वीकारावी. जाहिरातींमुळं गर्दी आकर्षित होणार नाही याची काळजी घ्यावी. आरोग्यविषयक, सामाजिक संदेश यासंबंधीच्या जाहिरातींना प्राधान्य द्यावं. ’माझं कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेबद्दल जनजागृती करावी. गरबा, दांडिया किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करु नये. त्याऐवजी आरोग्य शिबीरांच्या आयोजनास प्राधान्य द्यावं. आरती, भजन, किर्तन यांचे आयोजन करतेवेळी गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचं पालन करावं. देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट, फेसबुक इत्यादींद्वारे करण्याची जास्तीत जास्त व्यवस्था करावी. देवीच्या मंडपामध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणार्‍या भाविकांसाठी शारीरिक अंतर अर्था फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करावं. मास्क, सॅनिटायझर इत्यादींसह स्वच्छतेचे सर्व नियम पाळावेत. देवीची आगमन आणि विसर्जन मिरवणूक काढू नये. विसर्जनासाठी जातेवेळी आरती घरीच करुन जावं. विसर्जन स्थळी कमीत कमी वेळासाठी थांबावं. लहान मुल, ज्येष्ठ नागरिक यांनी सुरक्षेच्या कारणास्तव विसर्जनस्थळी जाऊ नये. चाळ, इमारत येथील सर्व घरगुती देवींच्या मूर्ती विसर्जनासाठी एकत्रित मिरवणूक काढू नये. महापालिका, विविध मंडळं, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था यांच्या सहाय्यानं कृत्रिम तलावांची निर्मीती करण्यात यावी. स्थआनिक प्रशासनानं प्रभाग समितीनिहाय मूर्ती स्वीकृती केंद्राची व्यवस्था करावी. मंडपात एका वेळी 5 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. मंडपात खाद्यपदार्थ सेवन आणि पेय पानास बंदी. विसर्जनाच्या दिवशी घरगुती, सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ परिसर प्रतिबंधीत क्षेत्रात असेल तर मूर्ती विसर्जन सार्वजनिक स्थळी करण्यास मनाई असेल. दसर्‍याच्या दिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम सर्व नियमांचं पालन करत प्रतिकात्मक स्वरुपाचा असावा. रावण दहनाकरता आवश्यक व्यक्तींचीच उपस्थिती असावी. कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकिय शिक्षण विभाग, संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी आखलेल्या नियमांचं पालन करणं सर्वांसाठी बंधनकारक असेल.