‘स्वच्छ सर्वेक्षण 2021’ बाबत विशेष कार्यशाळा

 नवी मुंबई ः नवी मुंबई महानगरपालिकेचा स्वच्छतेमधील देशातील तृतीय क्रमांक यावर्षी प्रथम करण्यासाठी सर्वांनी एकात्म भावनेने प्रयत्न करण्याचे आवाहन केले होते. त्यास अनुसरून घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्ष जोमाने कामाला लागले असून स्वच्छताविषयक आगामी कार्यपध्दती ठरविण्यासाठी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वच्छतेचे तीन ‘आर’ (रियूज, सियाकल)  हे ध्येय साध्य करण्यासाठी नागरिकांची मनोभूमिका तयार करणे हे आपले प्रमुख काम असेल असे सांगितले. त्

महात्मा गांधी जयंतीदिनी ‘स्वच्छता के छह साल-बेमिसाल’ या राष्ट्रीय उपक्रमांतर्गत यावर्षीच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण 2021’ चा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचा स्वच्छतेमधील देशातील तृतीय क्रमांक यावर्षी प्रथम करण्यासाठी सर्वांनी एकात्म भावनेने प्रयत्न करण्याचे आवाहन केले होते.

त्यास अनुसरून घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्ष जोमाने कामाला लागले असून स्वच्छताविषयक आगामी कार्यपध्दती ठरविण्यासाठी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात आयोजित या कार्यशाळेमध्ये सर्व स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, उपस्वच्छता निरीक्षक तसेच परिमंडळ निहाय कंत्राटदारांचे पर्यवेक्षक सहभागी झाले होते.

नवी मुंबई महानगरपालिकेस स्वच्छतेमध्ये नियमित प्राप्त होणारे मानांकन हा सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम असून यावर्षी आपले मानांकन उंचाविण्याचे लक्ष्य नजरेसमोर ठेवून ‘स्वच्छ सर्वेक्षण 2021’ ला सामोरे जाताना स्वच्छता कार्यात व मोहीमांत नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असावा याकरिता अधिक जोमाने प्रयत्न करावेत असे अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी यावेळी सूचित केले.

घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी देशात तिस-या क्रमांकाचे मानांकन आल्यामुळे आपली जबाबदारी वाढली असल्याचे सांगत दैनंदिन साफसफाई, कचरा वाहतुक, शौचालये सफाई अशा नियमित कामांप्रमाणेच यापुढील काळात स्वच्छतेचे तीन ‘आर’ (रियूज, सियाकल,  हे ध्येय साध्य करण्यासाठी नागरिकांची मनोभूमिका तयार करणे हे आपले प्रमुख काम असेल असे सांगितले. त्यादृष्टीने करावयाच्या कामकाजावर यावेळी विस्तृत चर्चा करण्यात आली. याप्रसंगी उत्तम साफसफाई कशी असावी याबाबतची एक ध्वनीचित्रफित दाखविण्यात आली. सदर कार्यशाळेचे नियोजन मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे यांनी केले. याकामी उपमुख्य स्वच्छता अधिकारी प्रल्हाद खोसे व विनायक जुईकर यांचे सहकार्य लाभले.