भाजपला गळती तर राष्ट्रवादीत इनकमिंग
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 03, 2020
- 850
महाजनांच्या बालेकिल्ल्यातील कार्यकर्ते राष्ट्रवादीत
जळगाव : एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भाजपला गळती लागली असून तेथील पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे राष्ट्रवादीत इनकमिंग सुरु झाले आहे. भाजपचे नेते गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला असणार्या जामनेर विधानसभा मतदारसंघातील जवळपास 200 भाजपमधील कार्यकर्त्यांनी खडसे यांच्या उपस्थितीमध्ये आज राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
जामनेर हा माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ला आहे. कालच माध्यमांशी बोलताना कुणीच भाजप सोडून गेले नसल्याचे वक्तव्य महाजन यांनी केले होते. मात्र आज त्यांच्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. जामनेर विधानसभा क्षेत्रातील देवपिंप्री आणि नेरी येथील भाजप कार्यकर्त्यांनी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यराक्ष रवींद्र भैय्या पाटील, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या उपस्थिती आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रवेश करणार्यामध्ये सर्व कार्यकर्ते हे भाजपमध्ये काम करत होते. त्यातले काही पदाधिकारी आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली.
दोन बसेसद्वारे आलेल्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू झाली आहे तर भाजपला मोठी गळती लागली आहे. दरम्यान, सोमवारी 2 नोव्हेंबर रोजी सुद्धा जळगाव जिल्ह्यातील अनेक भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. रावेर तालुक्यातील 60 भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी रोहिणी खडसे - खेवलकर यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai