एमआयडीसी क्षेत्रात 8 हजाराहून अधिक कोव्हीड चाचण्या
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 04, 2020
- 739
नवी मुंबई ः कोव्हीड 19 प्रसाराच्या दृष्टीने जोखमीचे असणार्या एम.आय.डी.सी. क्षेत्राकडे विशेष लक्ष पुरविण्याच्या दृष्टीकोनातून महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार 28 सप्टेंबरपासून विविध कंपन्यांमध्ये जाऊन कोव्हीड 19 टेस्टींग केले जात आहे. याशिवाय ठाणे बेलापूर इंडस्ट्रिज असोसिएशनच्या कार्यालयातही स्थायी कोव्हीड 19 तपासणी केंद्र कार्यान्वित आहे. एम.आय.डी.सी. क्षेत्रात आत्तापर्यंत 8055 अधिकारी, कर्मचारी यांच्या कोव्हीड 19 तपासण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये 191 चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. या कर्मचार्यांवर लगेच उपचार सुरू करण्यात आले असून त्या प्रत्येक पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कातील 22 हून अधिक व्यक्तींचीही तपासणी करण्यात आलेली आहे.
आत्तापर्यंत 24 मोठ्या उद्योग समुहांमध्ये शिबीर आयोजित करण्यात आले असून लहान उद्योग समुहातील कर्मचार्यांना त्यांच्या व्यवस्थापनामार्फत टी.बी.आय.ए. च्या कार्यालयात आणून टेस्टींग केले जात आहे. सध्या मागील 5 दिवसांपासून दिघा येथील मुकंद कंपनीत कोव्हीड 19 विशेष तपासणी शिबीर होत असून त्याठिकाणी दररोज साधारणत: 300 कर्मचार्यांची कोव्हीड विषयक तपासणी केली जात आहे. एम.आय.डी.सी. क्षेत्रात ही मोहीम राबविण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक महामंडळ, ठाणे बेलापूर इंडस्ट्रिज असोसिएशन, स्मॉल स्केल इंडस्ट्रिज असो. अशा विविध प्राधिकरण, संस्थाचे महत्वपूर्ण सहकार्य लाभत आहे. ए.पी.एम.सी. मार्केटप्रमाणेच एम.आय.डी.सी. क्षेत्रातील कंपन्या या कोव्हीडच्या दृष्टीने जोखमीच्या भागांकडे विशेष लक्ष देण्यात येत असून एम.आय.डी.सी. व एम.पी.सी.बी. कार्यालयांच्या सहयोगाने नवी मुंबई महानगरपालिका ही कोव्हीड 19 तपासणी मोहीम गांभीर्याने राबवित आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai