ई-संजीवनी ओपीडीला उत्तम प्रतिसाद
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 23, 2020
- 864
राज्यभरातून 7000 रुग्णांनी घेतला लाभ
नवी मुंबई ः कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात खासगी रुग्णालये बंद असल्यामुळे सामान्यांना वैद्यकीय सल्ला, आरोग्य तपासणीसाठी सुरु करण्यात आलेल्या ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवेचा राज्यभरात 7000 रुग्णांनी लाभ घेतला आहे. ही सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध असुन मोठया प्रमाणावर रुग्ण या सेवेचा लाभ घेत आहेत. या सेवेद्वारे रुग्णांना विडियो कॉन्फरन्सिंगचा वापर करून थेट घरबसल्या वैद्यकीय अधिकार्यांशी आजाराबाबत सल्लामसलत करता येते.
राज्यात एप्रिलमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू झालेली ही सेवा मे मध्ये पूर्णपणे सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी www.esanjeevaniopd.in या संकेतस्थळाला रुग्णांनी भेट देऊन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले होते. या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून एखादा रुग्ण राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून कुठल्याही जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकार्यांसोबत संगणक, लॅपटॉप यांचा वापर करुन कुठल्याही आजारावर सल्ला मसलत करु शकतो. सदर सेवेमार्फत रुग्ण सर्व आजारांबाबत वैद्यकीय अधिकार्यांशी सवांद साधू शकतात. तसेच कोवीड 19 साथीच्या आजाराने ग्रस्त असलेले रुग्ण जे घरी उपचार घेत आहेत किंवा विलगीकरण करण्यात आलेल्या रुग्णांना देखील या सेवेचा लाभ होत आहे. किरकोळ आजाराच्या व्यक्तींना या सेवेचा उपयोग चांगल्या प्रकारे होत असुन प्रकृतीच्या छोटया मोठया कुरबुरींवर घरात बसुन डॉक्टरांशी सल्लामसलत करता येते. अनरॉईड ॅमोबाइल धारक गुगल प्ले मध्ये जाऊन देखील इ संजीवनी ओपीडी ऑनलाइन अॅप डाऊनलोड करू शकतात. यावर नोंदणी व आवश्यक माहिती भरल्यावर आपल्याला थेट डॉक्टरांशी संपर्क करुन दिला जातो व डॉक्टर-पेशंट थेट संवाद सुरु होतो. कन्सल्टींग झाल्यावर आजारावर औषधांचे ई प्रिस्क्रीप्शन देखील ऑनलाईनच उपलब्ध होते. केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या या संयुक्त उपक्रमात ऑनलाईन ओपीडी 9:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत आणि दुपारी 3:00 ते संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत आहे व रविवारी ओपीडी बंद असते. राज्यातील विविध ठिकाणच्या जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांना ऑनलाईन ओपीडी सेवेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. सध्या मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या महानगरांमधून या ऑनलाईन ओपीडी सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- अशी आहे ई-संजीवनी ओपीडीची सेवा
1. नोंदणी करुन टोकन घेणे- मोबाईल क्रमांकद्वारे नोंदणी केल्यावर ओटीपी येतो. त्या माध्यमातून रुग्ण नोंदणी अर्ज भरतो. त्यानंतर टोकनसाठी विनंती केल्यानंतर आजारासंबंधी काही कागदपत्रे, रिपोर्ट अपलोड केले जातात. त्यानंतर एसएमएसद्वारे रुग्णाला ओळखक्रमांक आणि टोकन क्रमांक प्राप्त होतो.
2. लॉगईनसाठी एसएमएसद्वारे नोटिफिकेशन येते. त्यानंतर रुग्णाला दिलेल्या ओळख क्रमांकाच्या आधारे लॉगईन करता येते.
3. वेटिंग रुमवर एन्टर केल्यानंतर काही वेळातच कॉल नाऊ हे बटन कार्यान्वित (क्टिव्हेट) होते. त्यानंतर व्हिडिओ कॉलद्वारे डॉक्टरांशी चर्चा केली जाते.
4. चर्चेनंतर लगेच ई-प्रिस्क्रिप्शन प्राप्त होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai