Breaking News
25 नोव्हेंबरपासून होणार लागू ; आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक
मुंबई : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार वेळोवेळी योग्य त्या उपाययोजना करत असून ठोस निर्णय घेत आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्याची येत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. या अंतर्गत दिल्ली, एनसीआर, गुजरात, राजस्थान आणि गोव्यातून येणार्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. ही टेस्ट निगेटीव्ह आली तरच राज्यात प्रवेश दिला जाणार आहे.
दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णांत हळूहळू वाढ होत आहे. कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून राज्य सरकारही खबरदारीचे उपाय करत आहे. महाराष्ट्राची वाटचाल दिल्लीच्या दिशेने होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. परिस्थिती हाताबाहेर जावू नये, याकरता मोठ्या प्रमाणात स्क्रिनिंग, टेस्टिंगवर भर दिला जात आहे. तसंच मास्क न वापरणार्यांविरोधातही मोहीम तीव्र करण्यात आली आहे. आता मुंबईतल्या हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये काम करणार्या कर्मचार्यांचीही कोरोना चाचणी सुरू करण्यात आली आहे. विमान, ट्रेन व रस्त्याने महाराष्ट्रात प्रवेश करणार्या प्रवाशांसाठी, महाराष्ट्र सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या सूचना 25 नोव्हेंबरपासून लागू होतील. यामध्ये या अंतर्गत दिल्ली, एनसीआर, गुजरात, राजस्थान आणि गोव्यातून येणार्या विमान, टे्रन व रस्ता मार्गाने येणार्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. ही टेस्ट निगेटीव्ह आली तरच राज्यात प्रवेश दिला जाणार आहे. चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर उपचारासाठी सीसीसी मध्ये पाठवण्यात येणार आहे.
केंद्र आणि राज्य सरकारला दोन दिवसांत कोरोनाबाबतच्या तयारीचा अहवाल देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. गुजरात, दिल्ली, महाराष्ट्रातली परिस्थिती हाताबाहेर गेली आहे का ? असा सवाल कोर्टाने विचारला. कोविडच्या दुसर्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने सर्वतोपरी प्रयत्न करण्याची गरज आहे असं कोर्टाने खडावलं आहे. अहवाल आल्यावर पुढील सुनावणी 27 नोव्हेंबरला होणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai