खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


नशामुक्तीसाठी नवी मुंबई पोलिसांचा काव्यजागर

40 कवींचा सहभाग 

नवी मुंबई : नशामुक्ती अभियान यशस्वीपणे राबविण्यात साहित्य व कविता हे प्रभावी माध्यम आहे. पोलिसांच्या या अभियानात नागरिकांनी देखील मोठयाप्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी केले. नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्यावतीने आयोजित नशा मुक्तीसाठीचा काव्यजागर कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.  

बुधवारी सिडको भवन येथील सभागृहात संपन्न झालेल्या या काव्यजागर कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांच्या हस्ते झाले. नशा करणार्‍या एका व्यक्तीमुळे संपुर्ण कुटुंब व समाज विस्कळीत होतो. समाजातील जे नागरिक, तरुण नशेच्या आहारी गेले आहेत, त्यांना त्या नशेपासून परावृत्त करण्याचे काम देखिल पोलिस करीत आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी आपल्या कुटुंबात, आजूबाजूच्या परिसरात कोणी व्यक्ती कोणत्याही प्रकारची नशा करीत असेल त्याची माहिती पोलिसांना द्यावी असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले. नशेच्या आहारी गेलेल्या युवा पिढीला नशेच्या या जोखडातून बाहेर काढण्याकरिता पोलिस दलातर्फे नवनवीन संकल्पना राबविण्यात येत असल्याचे आयुक्त बिपिनकुमार सिंह यावेळी म्हणाले.  

किशोर वयीन मुलामुलींपासून ते जेष्ठांपर्यंत काही मंडळी नशेच्या विषारी विळख्यात कळत, नकळत भरडली जात आहेत. आणि या नशेच्या काळोखात नशा मुक्तीची ज्योत आज आपण सर्वांच्या साक्षीने लावणार आहोत. ही ज्योत नव्हे तर नशामुक्तीची मशाल घेऊन उभा महाराष्ट्र ड्रग्ज फ्री करण्याची शपथ घेवून हे काम आपण हाती घेतले असल्याचे  गुन्हे विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त तसेच कार्यक्रमाचे आयोजक बी. जी. शेखर पाटील यावेळी म्हणाले. नवी मुंबई पोलिस आयुक्तालय व लाईफ प्रोटेक्टर 100 यांच्या संयुक्त विद्यमाने हा काव्यजागर आयोजित करण्यात येत असून या अभियानाला समाजापर्यंत पोहचविण्यासाठी या कवी संमेलनाच्या माध्यमातून पहिले पुष्प गुंफत असल्याची माहिती आपल्या प्रास्ताविकात गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त विनोद चव्हाण यांनी दिली. 

नशामुक्तीसाठी आयोजित केलेल्या या काव्यजागर कार्यक्रमात राज्यातील विविध भागातून जवळपास 40 कवी सहभागी झाले होते. या कवींमध्ये पोलिस दलात कार्यरत असलेल्या अधिकारी-कर्मचार्‍यांचा देखील समावेश होता. तसेच यावेळी कुटुंबातील नशाबाज व्यक्तींमुळे भरडल्या गेलेल्या कुटुंबातील काही व्यक्तींनी व पोलिसांनी आपली मनोगते व्यक्त करुन नशा करणाऱया व्यक्तींना वेळीच थोपविण्याचे आवाहन केले. सदर कार्यक्रमाचे  आयोजन करण्यासाठी सहाय्यक पोलिस आयुक्त विनोद चव्हाण, पोलिस निरीक्षक एन. बी. कोल्हटकर, अर्जुन गरड, राजेंद्र बुधवंत, मीरा बनसोडे यांनी विशेष मेहनत घेतली. 

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट