महिलेला वाचविण्यात यश
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 01, 2020
- 668
नवी मुंबई : घाटकोपर येथे राहणार्या 45 वर्षीय महिलेने वाशी खाडीपुलावरून उडी मारली. मात्र तिने चक्कर येऊन तोल गेल्याने पडल्याचे पोलिसांना सांगितले. हिराबेन कटारमल (45, रा. असल्फा व्हिलेज, घाटकोपर प.) असे या महिलेचे नाव आहे.
ही महिला रविवारी 29 रोजी सकाळी घाटकोपरहून कोपरखैरणेला मुलीकडे जात होती. त्या वेळी चक्कर आल्यामुळे तोल गेल्याने पुलावरून पडून खाडीत पडली, असे तिचे म्हणणे आहे. या वेळी वाशी बीट मार्शल पोलिसांनी या पुलाखाली खाडीमध्ये मासेमारी करणार्या वाशी गावातील मच्छीमार महेश सुतार यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यांनी पोलिसांच्या मदतीने तत्काळ घटनास्थळी बोट नेऊन पाण्यात बुडत असलेल्या महिलेला बोटीत खेचून तिचे प्राण वाचवले. महिलेला दुपारी महापालिकेच्या ऐरोली रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. वाशी पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. कौटुंबिक वादातून त्यांनी हा प्रकार केला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai