
महाराष्ट्रातील शिक्षकाने पटकावले ‘ग्लोबल टीचर प्राईज’
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 04, 2020
- 1107
मुंबई : सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ‘ग्लोबल टीचर प्राईज’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कारासोबत त्यांना सात कोटी रुपयांची रक्कमही देण्यात आली. पुरस्कार मिळल्यानंतर देशभरातून रणजितसिंह डिसले यांच्या अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.
लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी डिसले गुरुजींच्या नावाची अधिकृत घोषणा केली. असा पुरस्कार मिळणारे ते पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत. जगभरातील 140 देशांतील 12 हजारहुन शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली आहे. टठ कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रचं नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रांत अभिनवं क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी 50 टक्के रक्कम अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केले असून, यामुळे 9 देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. डिसले गुरुजींना मिळालेली रक्कम ते टीचर इनोव्हेशन फंड करीता वापरणार असून त्यामुळे शिक्षकांमधील नवोपक्रमशिलतेला चालना मिळणार आहे.
डिसले यांचा सर्वस्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गाकयवाड यांनीही त्यांचे अभिनंद केले असून आता दलाई लामा यांनीही पत्रक काढून डिसले यांचं अभिनंदन केलं आहे. दलाई लामा यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, जगातील सर्वात अपवादात्मक शिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन. तसेच स्पर्धेत उपविजेते शिक्षकांना निम्म्या बक्षिसाच्या रक्कमचे वाटप करण्याच्या आपल्या औदार्याबद्दल तुमचे कौतुक करतो. लहान मुलांना, विशेषत: गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून वैयक्तिकरित्या मदत करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. एक चांगले जग निर्माण करण्यात तुमचं योगदान आहे. वंचित मुली शाळेत जात आहेत हे सुनिश्चित करण्याचे आपले काम तसेच त्यांच्यासाठी त्यांच्या भाषेत अभ्यास साहित्य तयार करण्याचा आपण प्रयत्न केले. आपण 83 देशांमधील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचे धडे देत आहात, हे उत्तम काम आहे. जेव्हा तुम्ही म्हणाल, आम्ही एकत्रितपणे बदल घडवू, तेव्हा आपण जगाला एक चांगली जागा बनवू शकू. तेव्हा तुम्ही अगदी बरोबर आहात. मला खात्री आहे की तुमची अनुकरणीय सेवा इतरांना तुमच्या पावलांवर पाऊल टाकण्यास प्रोत्साहित करेल, असं दलाई लामा यांनी म्हटलं.
ग्लोबल टिचर्स पुरस्कार नेमका आहे काय?
यात जगातील सर्वोत्तम 50 शिक्षकांची याकरता निवड करण्यात आली आहे. लंडन येथील वार्की फाऊंडेशनच्या वतीने 10 लाख अमेरिकन डॉलर्सचा हा पुरस्कार आहे. लंडन येथील ग्लोबल एज्युकेशन अँड स्किल फोरम या कार्यक्रमात हा पुरस्कार रणजीत डिसले यांना प्रदान करण्यात आला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai