खाडीपुलावरील ‘त्या’ घटनेचा झाला उलगडा
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 29, 2020
- 775
नवी मुंबई : वाशी खाडीपुलावर रेल्वे रुळालगत मंगळवारी सकाळी 21 वर्षीय तरुणी जखमी अवस्थेत सापडली होती. या घटनेविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते. या घटनेमुळे रेल्वे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. नुकतंच या घटनेतील पीडित तरुणीला सहा दिवसांनी शुद्ध आली आहे. त्यामुळे या घटनेचा उलगडा झाला आहे.
मंगळवारी (22 डिसेंबर) एक तरुणी वाशी खाडी पुलाजवळ रेल्वे ट्रकच्या बाजूला रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. त्यानंतर वाशी रेल्वे पोलिसांनी त्वरीत या जखमी तरुणीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. ती तरुणी अधर्वट बेशुद्ध अवस्थेत ही तरुणी तिचे नाव ,आईचे नाव आणि टिटवाळा हे तीन शब्द उच्चारीत होती. या घटनेतील पीडित तरुणीला तब्बल सहा दिवसांनी शुद्ध आली आहे. यानंतर या पीडित तरुणीचा पोलिसांनी जबाब नोंदवला होता. या जबाबात तिने स्वतःचा तोल गेल्याने ती खाली पडली, असे सांगितले. तसेच तिच्यावर कोणताही अतिप्रसंग झालेला नाही, हेही उघड झाले आहे.
दरम्यान तरुणीने दिलेला हा जबाब आणि पोलिसांच्या तपास यात सुसंगता आढळली आहे. मात्र या तरुणीच्या वैद्यकीय अहवालात तिच्यावर बलात्कार झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र आता नमूद गुन्ह्यात 307, 376 प्रमाणे गुन्हा घडला नसल्याचे निष्पन्न झाले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai