खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


मतभेद व मनभेदाला भाजपमध्ये थारा नाही - आशिष शेलार

नवी मुंबई  नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्वपक्षीय तयारीला लागले आहेत. भाजपाने नवी मुंबईची जबाबदारी आशिष शेलार यांच्याकडे सोपवली आहे. नवी मुंबई भाजप मधील मतभेद दूर करण्यासाठी भाजप नेते आशिष शेलार बुुधवारी नवी मुंबईत आले. यावेळी त्यांनी आमदार मंदा म्हात्रे व गणेश नाईक यांची भेट घेतली, तसेच मतभेद आणि मनभेदाला भाजपमध्ये थारा नाही, असे वक्तव्ये केले.

नवी मुंबई महानगर पालिकेच्या येणार्‍या निवडणुकांचे नियोजन व सद्यस्थितीत नवी मुंबईत महाआघाडीच्या माध्यमातून सुरू असलेले नगरसेवक फोडाफोडीचे राजकारण या संदर्भात समन्वय साधण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार आशिष शेलार यांनी भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी यांची वैयक्तिक भेट घेण्यासाठी, तसेच सवांद साधण्यासाठी नवी मुंबईचा दौरा केला. शेलार यांनी भाजप नेते गणेश नाईक, मंदा म्हात्रे, रमेश पाटील हे शक्तीशाली नेतृत्व आहे व आमचा कार्यकर्ता आमच्या पक्षाची ताकत आहे, असे वक्तव्य केले. 

भाजपमध्ये ज्येष्ठ झालेल्या म्हात्रे यांच्या घरी त्यांनी पहिली हजेरी लावली. त्यावेळी म्हात्रे सर्मथक माजी नगरसेवक व पदाधिकार्‍यांनी शेलार यांचे स्वागत केले. 2015 मध्ये देश व राज्यात मोदी लाट असताना म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली 111 नगरसेवकांपैकी भाजपाचे केवळ सहा नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी काही नगरसेवकांनी शेलार यांची भेट घेतली. बेलापूरहून निघालेल्या शेलार यांनी नंतर खैरणे एमआयडीसीत असलेल्या नाईक यांच्या कार्यालयात जात त्यांची भेट घेतली. या दोन्ही भेटी या वैयक्तिक घेऊन दोन आमदारांमधील मतभेदाचे कारण व पालिका निवडणुकीतील तयारीचा आढावा शेलार यांनी घेतला. त्यानंतर मात्र त्यांचा मोर्चा कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेश पाटील यांच्या तळवली येथील घरी वळविला. पाटील यांनी आपल्या कोळी महासंघाचा भाजपला गेली सात वर्षे पाठिंबा दिला असून त्या बदल्यात पक्षाने त्यांना विधान परिषद दिलेली आहे.

नवी मुंबई महानगर पालिका निवडणूक तोंडावर आली असली तरी येथील आमदार गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यात जुने भाजप विरुध्द नवीन भाजप असा वाद उफाळून आला तर याचा मोठा फटका निवडणुकीत भाजपला बसण्याची दाट शक्यता आहे. हे लक्षात घेवून भाजप नेते आशिष शेलार यांनी नवी मुंबईत येवून दोन्ही आमदारांची बैठक घेतली. नवी मुंबईतील निवडणूक प्रभारी म्हणून आशिष शेलार यांची पक्षाने नियुक्ती केली आहे. भाजपमध्ये मतभेद, मनभेदाला थारा नसल्याचे आशिष शेलार यांनी स्पष्ट केले. 

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट