Breaking News
मुंबई : शुक्रवारपासून कॉल करण्याबाबत एक बदल झाला आहे. लँडलाईनवरून मोबाईलवर कॉल करण्यासाठी आधी ‘0’ लावावा लागेल. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने याची शिफारस केली होती, त्यानंतर आता दूरसंचार विभागाने ती मान्य केली आहे. यामुळे टेलिकॉम कंपन्यांना अधिकाधिक क्रमांक मिळू शकेल.
ग्राहकांना त्रास होऊ नये, म्हणून कंपन्यांनी 1 दिवस अगोदर माहिती दिली. शुक्रवार 15 जानेवारीपासून लँडलाईनवरून मोबाईलवर कॉल करतांना आधी 0 डायल करावा लागणार आहे. दूरसंचार कंपन्यांनी गुरुवारी ग्राहकांना आठवण करून दिली. दूरसंचार विभागाने यासाठी नुकतेच एक निर्देश जारी केले आहे. एअरटेलने आपल्या फिक्स्ड लाईन वापरकर्त्यांना सांगितले की, 15 जानेवारी 2021 पासून सुरू दूरसंचार विभागाच्या निर्देशानुसार आपल्या लँडलाईनवरून मोबाईलशी फोन कनेक्ट करताना आपल्याला नंबर आधी शून्य डायल करावे लागेल. रिलायन्स जिओने आपल्या फिक्स्ड-लाइन वापरकर्त्यांना देखील याची आठवण करून दिली.
दूरसंचार विभागाने नोव्हेंबरमध्ये म्हटले होते की, 15 जानेवारीपासून लँडलाईनवरून मोबाईलवर कॉल करताना ग्राहकांना प्रथम शून्य डायल करावे लागेल. मंत्रालयाचे म्हणणे आहे की या टप्प्यामुळे भविष्यात बर्याच नवीन संख्या निर्माण होतील. सुमारे 253.9 कोटी नवीन संख्या तयार होण्याची अंदाज आहे.
आपला मोबाइल नंबर आता 10 ऐवजी 11 अंकांचा असेल तर ते चुकीचे होणार नाही. वास्तविक, लँडलाईनवरून मोबाईल क्रमांकावर कॉल करण्यासाठी केवळ 11 क्रमांक डायल करावे लागतील. याआधी मोबाईलवर कॉल करताना शुन्य लावणं अनिवार्य नव्हतं.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai