सिडकोच्या तिजोरीत 91 कोटींची भर
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 27, 2021
- 716
खारघर येथील निवासी तथा वाणिज्यिक भूखंडांना विक्रमी दर
नवी मुंबई ः सिडको महामंडळातर्फे ई-लिलाव व ई-निविदा प्रक्रियेद्वारे खारघर येथील एकूण 4 निवासी तथा वाणिज्यिक भूखंडांच्या भाडेपट्ट्यावर विक्री योजनेस निविदाकारांचा उत्तम प्रतिसाद लाभून सदर भूखंडांना विक्रमी दर प्राप्त झाला आहे. 25 जानेवारी 2021 रोजी ऑनलाईन माध्यमातून ई-निविदा उघडण्यात आल्या व ई-लिलाव प्रक्रियेमधील बोलींची तुलना करण्यात येऊन यशस्वी निविदादारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या भूखंड विक्रीतून सिडकोच्या तिजोरीत अंदाजे रू. 91 कोटींची भर पडली आहे.
खारघर येथील सेक्टर 16 मधील क्र. 8 ए या भूखंडाची आधारभूत रक्कम रू. 60,939 प्रति चौ.मी. होती व या भूखंडास रू. 1,41,987 प्रति चौ.मी., खारघर येथील सेक्टर 16 मधील क्र. 9 या भूखंडाची आधारभूत रक्कम रू. 73,635 प्रति चौ. मी. होती व या भूखंडास रू. 1,27,635 प्रति चौ.मी., खारघर येथील सेक्टर 16 मधील क्र. 9 ए या भूखंडाची आधारभूत रक्कम रू. 60,939 प्रति चौ. मी. होती व या भूखंडास रू. 1,56,789 प्रति चौ.मी. तर खारघर येथील सेक्टर 16 मधील क्र. 9 बी या भूखंडाची आधारभूत रक्कम रू. 60,939 प्रति चौ.मी. होती व या भूखंडास रू. 1,56,699 प्रति चौ.मी. असा विक्रमी दर प्राप्त झाला आहे.
सदर योजने अंतर्गत सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर 16 मधील एकूण 4 भूखंड भाडेपट्ट्यावर विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आले होते. सदर भूखंड हे निवासी/वाणिज्यिक वापराकरिता उपलब्ध होते. सर्व भूखंडांना 1.5 चटईक्षेत्र निर्देशांक निश्चित करण्यात आला आहे. ई-लिलाव व ई-निविदा प्रक्रिये अंतर्गत अर्ज नोंदणी, अनामत रकमेचा भरणा, निविदा भरणे या सर्व प्रक्रिया सुलभ, पारदर्शक व जलद अशा ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात आल्या. यामध्ये ऑनलाईन माध्यमातून बंद निविदा सादर केल्यानंतर अर्जदरांना पुढील टप्प्यातील ई-लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार होते.
बंद निविदेमध्ये उद्धृत करण्यात आलेली बोली किंवा ई-लिलावामध्ये उद्धृत करण्यात आलेली बोली यांपैकी जी बोली जास्त रकमेची असेल ती बोली स्वीकारण्याचा निकष निश्चित करण्यात आला होता. या भूखंड विक्री योजनांच्या माध्यमातून रियल इस्टेट क्षेत्राला नवचैतन्य प्राप्त होऊन विकासकांना प्रगतीची नवी दालने खुली झाली आहेत, असे मत सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी व्यक्त केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai