Breaking News
मुंबई : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारकडून दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. यात चार पोलीस अधिकार्यांना राष्ट्रपती पदक, 13 जणांना पोलीस शौर्य पदक तर 40 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस पदक देऊन सन्मानित केले. या शूरांमध्ये नवी मुंबईतील तीन पोलीस शूरांचा समावेश आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गृह मंत्रालयाने घोषीत केलेल्या महाराष्ट्रातील 57 पोलिसांचा गौरव प्रजासत्ताक दिनी करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती पदक, उत्कृष्ट सेवा पदक, गुणवत्तापूर्ण सेवा पदके देऊन पोलिसांचा गौरव केला जातो. महाराष्ट्राने 57 पदके मिळून देशात तिसरं स्थान मिळवले आहे. नवी मुंबई पोलीस उपायुक्त(गुन्हे शाखा) प्रविणकुमार पाटील, पोलीस निरिक्षक रविंद्र दौंडकर, सहायक उपनिरिक्षक संजय पवार यांना गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पोलीस पदक देण्यात आले. तसेच ठाणे गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त निवृत्ती उर्फ एन.टी. कदम यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीच्या पोलीस उपअधीक्षक संगीता शिंदे यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पदक प्राप्त झाले. तर भिवंडीतील निजामपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय डोळस, पोलीस मुख्यालयातील सहा.पो. उपनिरीक्षक थॉमस डिसुझा, गुन्हे शाखेचे सहा.पो. उपनिरीक्षक सुरेश मोरे आणि खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रमेश कदम यांना उत्कृष्ट सेवेबद्दल पोलीस पदक मिळाले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai