रविवारी बाजार समितीचा हाफ डे
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 05, 2021
- 700
नवी मुंबई : रविवारी बाजार समितीला कार्यालयीन सुट्टी असते. मात्र आता हापूस आंब्यांचा हंगाम सुरू होत आहे. रविवारीही आंब्याच्या गाड्या बाजारात येतात.बाजार आवर बंद असल्याने या गाड्या बाजाराच्या बाहेर उभ्या कराव्या लागतात; मात्र आता फळांवरील नियमन हटवल्याने हा आंबा थेट मुंबईच्या किरकोळ बाजारात जाऊ शकतो. यामुळे बाजार समितीला मिळणारा सेसही बुडतो.परिणामी यापुढे दर रविवारी अर्धा दिवस बाजार सुरू राहणार आहे. बाजार समितीने यासंदर्भात निर्णय घेतला आहे.
कृषी कायद्यात बदल होत असल्याने बाजारात व्यापार करण्याच्या पद्धती बदलत आहेत. त्यामुळे या बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी बाजार समितीनेही आपल्या नियमात बदल करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे दर रविवारी फळबाजार आवर सुरू ठेवला जाणार आहे. बाजारात येणार्या मालावरील सेस मिळावा तसेच सेस वसुलीसाठी कार्यालय सुरू ठेवले जाणार आहे. तशा सूचना व्यापारी संघटना आणि व्यापार्यांना बाजार समितीने दिल्या आहेत. त्यामुळे आता रविवारी बाजार समिती सुरू राहणार आहे. रविवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. आंब्याच्या हंगामात व्यापार्यांना चांगला व्यापार करता येतो आणि या बाजारामुळे बाजार समितीलाही चांगला महसूल मिळतो; मात्र आता बाजार समितीच्या आवारात कृषिमाल न आणता थेट किरकोळ बाजारात विकण्याची मुभा सरकारने दिल्याने बाजार समितीमध्ये येणारा बहुतांशी कृषिमाल थेट किरकोळ बाजारात जात असतो. आता आंब्याच्या बाबतीत हेच झाल्यास आंब्याचा बाजारातील व्यापार कमी होऊ शकतो. त्यामुळे काही व्यापार्यांनी बाजार समितीकडे यासंदर्भात मागणी केली होती. त्यानुसार रविवारीही बाजार सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai