तळोजात एमआयडीसीत अग्नितांडव

केमिकल कंपनीला भीषण आग ; बाजुच्या दोन कंपन्यांनाही झळ

तळोजा ः नवी मुंबईतील तळोजा एमआयडीसीतील केमिकल कंपनीला आग लागली आहे.  आग वाढत केमिकल कंपनीला लागून असलेल्या इतर कंपन्यांना देखील ही आगल लागत आहे. फायर ब्रिगेडद्वारे आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. सिडको, एमआयडीसी अग्निशमन दलाच्या 12 गाड्या आग विझविण्याचे फोमिंग सिस्टम, पाण्याद्वारे काम करत आहेत.

तळोजा एमआयडीतील एजिओक्रीस्ट या कारखान्याला दुपारी एकच्या सुमारास भीषण आग लागली. आगीची तिव्रता एवढी भिषण आहे की यामुळे आजुबाजुच्या दोन कारखान्यांनाही त्याची झळ पोहचली आहे. यात मोठ्या प्रमाणात मालमत्तेची हानी झाली आहे. मागील 4 तासांपासून येथे अग्नितांडव सुरु आहे. आगीचे लोढ परिसरात पसरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अग्निशमन जवान आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजले नाही.