Breaking News
या नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माघी गणेशोत्सवासाठी राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे. भाद्रपदातील गणेशोत्सवाप्रमाणेच माघी गणेशोत्सवही नियमांच्या चौकटीत राहून साजरा करा, असा निर्देश राज्य सरकारने मंडळांना दिले आहेत.
गणेशमूर्ती, मंडपाच्या आकारावर निर्बंध ठेवण्यात आले आहे. मंडपात एका वेळी 10 हून अधिक कार्यकर्ते नसावेत, असं देखील राज्य सरकारने सांगितले आहे. तसेच माघी गणेशोत्सवात मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्सव साधेपणानं साजरा करण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. 15 फेब्रुवारीपासून माघी गणेशोत्सव सुरु होतोय. त्यासाठी राज्य सरकारनं नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार मंडप उभारणीसाठी पालिकेची किंवा स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. मंडप मर्यादित आकाराचा असावा, आगमन-विसर्जन मिरवणुका काढता येणार नाही. सार्वजनिक मूर्तीची उंची चार फूट तर घरगुती मूर्तीची उंची दोन फूट असावी, शक्य असल्यास धातूच्या किंवा संगमरवरी मूर्तीचे पूजन करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
मंडपात एका वेळी 10 पेक्षा जास्त कार्यकर्ते आणि 15 पेक्षा अधिक भाविक नसावे. भाद्रपदातील गणेशोत्सवाप्रमाणे माघी गणेशोत्सवही नियमांच्या चौकटीत राहून साजरा करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.
राज्यसरकारकडून मंडळांसाठी कोणते नियम?
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai