पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


छत्रपती शिवाजी महाराज-रयतेचा राजा

शिवछत्रपती जयंती म्हणजे मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी ज्या दिवशी एका तेजस्वी सूर्याने जन्म घेतला तो दिवस. ज्या काळात मुघल सम्राज्यविरुद्ध मुखातून ब्र काढण्याची सोय नव्हती त्या काळात मराठी मुलखाची शान असणारा भगवा हातात घेऊन मुघलांच्या ताब्यातील गड, किल्ले व मुलुख परत मिळविण्यासाठी जीवाचे रान करणारा स्वाभिमानी राजा म्हणजे शिवछत्रपती. महाराष्ट्राचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथांनी समृद्ध झाला आहे. रयतेचा राजा, उत्तम संघटक आणि पराक्रमी योद्धा म्हणून त्यांनी आजवर फत्ते केलेल्या अनेक मोहिमा आज आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी गडावर या तेजस्वी तार्‍याचा जन्म झाला व त्याने न भुतो असा इतिहास घडवला. मर्दमराठा मावळ्यांना मातृभूमी व स्वतःच्या ताबेदारीबाबत जाणीव करून देऊन त्यांना सोबत घेऊन मुघलांना सळो कि पळो करून सोडणारे आमचे राजे शिवाजी. ज्याचे नाव मराठी माणसाच्या हृदयात व मनात कायमचे कोरले गेले आहे व ज्याच्या वंदनाशिवाय आज कोणत्याही क्रांतिकारी कामाची सुरुवात करता येत नाही असे तमाम मराठ्यांचा व हिंदूंचा आदर्श म्हणजे शिवछत्रपती. मराठी माणसाला स्वाभिमानाने व ताठ मानेने आपल्या न्याय व हक्कांसाठी जगायला शिकवणारे आमचे शिवाजी महाराज आज देशातच नव्हे तर जगात आदर्श व्यक्तिमत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारख रत्नपारखी राजा होणे नाही. राजांनी मावळ्यांमधून स्वराज्यासाठी रत्ने घडविली. महाराज इतिहासाचे महानायक होते तर मावळे इतिहासाचे आधारस्तंभ. मुघलांच्या पाशवी साम्राज्याला, सर्वच बाबतीत मग ते तिन्ही दलांचे सैन्य, शस्त्रसाठा या बाबतीत उजवे असणार्‍यांना मोजक्या मावळ्यांच्या जोरावर आपल्या गनिमी काव्याच्या आधारावर लढा देऊन मातृभूमीच्या रक्षणासाठी झटणारे छत्रपती पुन्हा होणे नाही. शत्रूची प्रत्येक चाल अत्यंत दक्षपणे हेरून त्यांना आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर देणारा आमचा राजा आज आम्हाला अनेक उदाहरणांवरून वारंवार आठवला जातो. अफजलखानाचा वध असो कि शाहिस्तेखानानाची फजिती यासारख्या अनेक घटनांतून शिवाजी महाराजांचा परिचय आम्हाला व येणार्‍या अनेक पिढ्यांना उद्बोधकच राहील. शिवाजी महाराजांनी त्यांच्या अचाट बुद्धिमतेच्या व युद्धकौशल्याच्या जोरावर गड, किल्ले, सुभेदार्या शत्रूच्या ताब्यातून परत मिळवून मराठी साम्राज्याची  मुहूर्तमेढ रोवली व पारतंत्रयाविरुद्ध आवाज उठविण्याची ताकत सामाजात निर्माण केली. कर्तबगारी, स्वाभिमान, मातृभूमीप्रेम, विधायक दृष्टिकोन, अन्यायाविरुद्ध उठाव, परस्त्रीबद्दलचा आदर, मराठी अस्मितेचा पुरस्कार, कुशल नेतृत्व या बाबी आजच्या पिढीला छत्रपतींकडूनच अनुकरणीय आहेत. इतिहास लिहिणारे अनेक झाले पण इतिहास घडविणारे फक्त आमचे शिवछत्रपतीच. संपूर्ण जगाला स्फूर्ती देणारे व्यक्तिमत्व असलेल्या शिवाजी राजांचा जुलमी सत्तेला संपविण्याचा कित्ता अनेकांनी गिरवला. परंतु दुर्दैवाने आजच्या काळात आपल्या देशातीलच अनेक लोकांना त्यांच्या पराक्रमाबद्दल व शोर्याबद्दल पुरेशी माहितीच नाही याबद्दल खेद वाटतो. 

शिवरायांसोबत मराठी साम्राज्याचा विस्तार अटकेपार करताना अनेक मावळे धारातीर्थी पडले. सह्याद्रीच्या गडकिल्यावरील बुरजांसारखी अभेद्य निष्ठा असलेल्या मावळ्यांनी महाराजांवरील श्रद्धा व स्वराज्यप्रेमापोटी जीवाची पर्वा केली नाही. त्यांचे बलिदान, पराक्रम व स्वराज्यासाठी त्याग आजही सर्वांसाठी स्फूर्तिदायक आहे.

आज कोणताही राजकीय पक्ष असो शिवछत्रपतींना वंदन केल्याशिवाय पुढे सरकत नाही. म्हणूनच शिववंदनेसाठी कोणत्याही जात धर्म पंथ पक्षाचा अडसर आज येत नाही. छत्रपतींच्या कार्याची महती आपल्या भावी पिढ्यांना कळण्यासाठी शिव स्मारकांची निर्मिती राज्यातील जिल्ह्याजिल्ह्यात व महानगरपालिकात झाली पाहिजे. मराठी धर्म व मराठी माणूस जर टिकवायचा असेल तर येणार्‍या काळात आपल्या समाजाला छत्रपती कळालेच पाहिजेत. महाराजांनी आयुष्यभर फक्त माणसे जोडण्याचे काम केले आणि म्हणूनच मराठी पताका साता समुद्रापार फडकू शकली व भगवी लाट प्रभावी ठरून मुघल व परदेशी सत्तेचा नायनाट झाला.  शिवाजी महाराजांनी मराठी माणसावर अतोनात प्रेम केले परंतु त्यांनी इतर धर्माच्या लोकांनादेखील कधीही दुरावू दिले नाही. महाराजांकडे जीवाला जीव देणारे अनेक मुस्लिम सरदार होते. 

स्वराज्याची लढाई हि सर्वाना सोबत घेऊनच लढली जाऊ शकते हि भावना शिवप्रभूंनी सर्व स्तरात रुजवली. जातीपातीचे, धर्माधर्माचे व स्पृश्य अस्पृश्याचे राजकारण करणार्‍या लोकांना महाराजांनी समानतेचा एक मोठा आदर्श घालून दिला. परन्तु आज आपल्या समाजातील सर्वच बाबतीतील भेदभावाचे राजकारण, मराठी माणसे व नेत्यांतील फुटीचे राजकारण, आपसातील वैर, यामुळे खच्ची होत असलेला मराठी माणूस पाहताना सर्वात मोठा खेद महाराजांना होत असावा. ज्या उद्देशाने स्वराज्य घडविले त्या उद्देशालाच तडा पडण्याचे काम होत असताना राजांच्या मनाला किती वेदना होत असतील याची कल्पना करा. केवळ शिवजयंतीला शिवरायांची आठवण करण्याऐवजी त्यांनी दिलेले धडे, शिकवण व त्यांचे कर्तृत्व याचे अनुकरण झाले पाहिजे. शिवचरित्राचे ज्ञान आपल्याबरोबरच आपल्या भावी पिढीलादेखील करून देण्याचा संकल्प आपण या निमित्ताने करू या.

शिवजयंती दिनाच्या निमित्ताने या महापुरुषाला मानाचा मुजरा. 
॥ जय शिवाजी जय भावानी ॥ 
॥ जय हिंद जय महाराष्ट्र ॥
-वैभव पाटील

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट